Agriculture Processing

शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना लाभ मिळतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या हमीभावानुसार राज्य सरकारकडून शेतमालाची खरेदी केली जाते.

Updated on 13 October, 2022 4:54 PM IST

शेतकऱ्यांसाठी सरकार नवनवीन योजना (new scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना लाभ मिळतो. शेतकऱ्यांच्या शेतमालाविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या हमीभावानुसार राज्य सरकारकडून शेतमालाची खरेदी केली जाते.

मात्र या खरेदी प्रक्रियेत व्यापारीच हात मारत असल्याची घटना समोर आली आहे. अशा गैरकारभाराला चाप लावण्यात येणार आहे, यासाठी नोंदणी करताना तसेच प्रत्यक्ष शेतमाल विक्री करताना शेतकऱ्यांचे छायाचित्र काढले जाणार आहे. अशा सुचना काढून अंमलबजावणी करण्यास सुरुवात देखील करण्यात आली आहे.

हंगामात शासकीय केंद्रावर हमीभावाने विविध शेतमालाची खरेदी (agricultural products) केली जाणार आहे. सध्या मका, ज्वारी, बाजरीची खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी नाव नोंदणीची प्रक्रिया राबविली जात आहे. शेतकऱ्यांना १५ तारखेपर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन पणन प्रशासनाने केले आहे.

शेतकरी मित्रांनो माती परीक्षण प्रयोगशाळा व्यवसाय सुरू करा; कमवाल लाखों रुपये

यासाठी सातबारा, बँक पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रे मागितली जात आहेत. सोबतच आता प्रथमच छायाचित्रही काढणे गरजेचे ठरणार आहे. जो शेतकरी (farmers) हमीभाव केंद्रावर आपला शेतमाल विक्रीसाठी नोंदणी करेल, त्याचे छायाचित्र काढण्यात येणार आहेत.

सावधान! सर्दी खोकला असू शकतो 'या' आजाराची लक्षणे

शेतकऱ्यांना होणार फायदा

प्रत्येकवेळी शासकीय केंद्रावर गावखेड्यातील व्यापारी इतरांच्या नावाने सातबारा जोडून शेतमाल विकत असल्याचे लपून राहिलेले नाही.परंतु आजवर हे गैरप्रकार रोखणे जुळले नव्हते. आता नोंदणीपासून तर विक्रीपर्यंत खबरदारी घेणे सुरु केल्याने किमान यामुळे तरी गैरप्रकार थांबतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महत्वाचा बातम्या 
कौतुकास्पद! शेतकऱ्याने नवीन पद्धतीच्या वापराने १६ फूट ऊस वाढवला; घेतोय दुप्पट उत्पादन
LIC ची जबरदस्त योजना लाँच; गुंतवणुकीवर मिळणार 3 लाख रुपयांचा फायदा
नाशिकमधील बनावट कीटकनाशकांचा 295 लिटरचा साठा जप्त

English Summary: Chaf blamed mismanagement traders purchase agricultural products Farmers
Published on: 13 October 2022, 04:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)