Agriculture Processing

केक म्हटलं की आपल्याला आठवतो एखादा समारंभ जसे की वाढदिवस, एकदा वर्धापन दिन आणि लग्न समारंभ किंवा एखाद्या औपचारिक प्रसंगी केकला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

Updated on 26 March, 2022 4:20 PM IST

 केक म्हटलं की आपल्याला आठवतो एखादा समारंभ जसे की वाढदिवस, एकदा वर्धापन दिन आणि लग्न समारंभ किंवा एखाद्या औपचारिक प्रसंगी केकला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

जर पूर्वीच्या काही दिवसांचा विचार केला तर केक बनवणे ही प्रक्रिया गुंतागुंतीची आणि फारच क्लिष्ट असे समजले जायचे. परंतु आता केक बनविण्याच्या असंख्य रेसिपी आल्याने तसेच बेकिंग उपकरणे आणि केक बनवण्याच्या सोप्या पद्धती मुळे केक अगदी कोणीही बनवू शकतो. या लेखामध्ये आपण केक व्यवसायातील संधी आणि बनवण्याच्या पद्धती आणि साहित्य याविषयी माहिती घेणार आहोत.

1) केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

 मैदा 25 टक्के, साखर 20 टक्के, मिल्क प्रोटीन 9.96 टक्के, पाणी 28 टक्के, पामतेल सात टक्के, व्हॅनिला इसेन्स 0.12 टक्के, बेकिंग पावडर 8 टक्के, बेकिंग सोडा 0.12 टक्के, सोर्बीक आमल 1., मीठ 0.5 टक्के याप्रमाणे मिश्रण करून घ्यावे.

नक्की वाचा:कधी नव्हे ते पुणे जिल्हात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी, काय आहेत कारणे, वाचा..

2) केक बनवण्याची पद्धत:

 सगळ्यात अगोदर मैदा शिफ्टर मधून चाळून घ्यावा. वरील सर्व साहित्य चार ते पाच मिनिटे एकत्र मिसळून या मिश्रणाला दोन ते तीन वेळा चाळून घ्यावे. हे सगळ्या प्रकारचे तयार झालेले मिश्रण केकच्या साच्या मध्ये टाकावे. बेकिंग साठी बेकरी ओव्हनमध्ये 170 अंश सेल्सिअस तापमानाला 25 मिनिटे ठेवावे.

नंतर हे मिश्रण बाहेर काढून सामान्य तापमानात थंड करावे. त्यानंतर हे मिश्रण साच्यातून बाहेर काढून त्याचे काप करावेत. या सगळ्यांचा स्पॉन्ज तयार झाल्यानंतर त्यावर शिरफ स्प्रे करावे. नंतर त्यावर क्रीमचा थर द्यावा. तयार झालेल्या केकचा सुगंधित क्रीमने सजावट करून त्याची साठवणूक 4 अंश सेल्सिअस तापमानात करावी. व मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी पाठवावे.

3) केक विक्री व्यवसाय वाढवण्यासाठी टिप्स:

1) त्याचे विविध प्रकार आणि वेगळ्या पद्धती असतात, त्या पद्धती शिकून घेऊन स्वतःचे केक शॉप चालू करता येते. स्वच्छतेचे सर्व निकष पाळून आणि केकची चांगली गुणवत्ता देऊन ग्राहकांना आकर्षित करता येऊ शकते

2) जर या व्यवसायामध्ये जम बसला तर केकचा स्वतःचा ब्रँड तयार करता येऊ शकतो. आणि जर आपण निर्माण केलेला ब्रँड लोकप्रिय झाला तर विविध ठिकाणांचा अभ्यास करून आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन वेगवेगळ्या शहरात स्वतःची फ्रॅचाइजी सुरू करता येते.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! ऑस्ट्रेलियन हवामान खात्यानुसार महाराष्ट्रात चारही महिने पडणार पाऊस

3) हा व्यवसाय एकापेक्षा जास्त शहरात आणि हळूहळू पूर्ण भारतात या पद्धतीने करता येऊ शकतो. फ्रॅचाइजी च्या बाबतीत बोलायचे झाले तर सर्वसाधारणपणे ज्या शहरांमध्ये हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या शहराचे सर्वक्षण करून आपण तिथे किती फ्रॅचाइजी सुरु करु शकतो याचा विचार करून सर्वसाधारणपणे 25 शॉप साठी एक मास्टर फ्रॅचाइजी असावी. अशाप्रकारे आपण टप्प्याटप्प्याने स्वतःचा ब्रँड निर्माण करून या व्यवसायात प्रगती उत्तम प्रकारे करू शकतात.    

English Summary: cake making bussiness is short investment bussiness that give more profit
Published on: 26 March 2022, 04:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)