इरिच इंटल इंडिया लिमिटेड ही कंपनी उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन संपूर्ण देशभरात “जमीन वाचवा...जीवन वाचवा” ही एक चळवळ राबवत आहे. यामध्ये कित्येक शेतकरी सहभागी होऊन आपल्या नापीक होत चाललेल्या शेतीला जीवदान देण्याचे काम करत आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली भारतातील शेतीमध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर सुरू झाला. त्यामुळे पीक उत्पादनही जोरात वाढले, परंतु कालांतराने त्याचा परिणाम शेती व मानवी आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले.
त्यामुळे निसर्गनिर्मित अशी जमिनीला सुपिक ठेवण्याची उपजत यंत्रणा खंडित झाली. अधिक पीक उत्पादन निर्मितीच्या भावनेने पिकांना टाकलेल्या केमिकल रसायनामुळे फळे, पालेभाज्या व धनधान्यच्या चवी तर बदलल्याच परंतु ती रसायने जशीच्या तशी मानवी आरोग्यात प्रवेश करू लागली आणि कर्करोगासारख्या न पाहिलेल्या रोगांना आमंत्रण देऊ लागली.
वाढत्या केमिकलच्या वापरामुळे भारतातील शेतजमीन नापीक होत चालली आहे. हे जर असंच सुरू राहीले, तर येणाऱ्या काळात देशात अन्नधान्याची टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष, जिवसृष्टिची अपरिमित हानी, वातावरणातील प्रतिकूल बदल, उपजिविकेची हानी, अन्नधान्य व पाण्याच्या शोधार्थ स्थलांतर यांसारख्या अतिभयानक व अतिसंहारक परिणामांना देशाला सामोरं जावं लागेल.
यासाठी भारतातील प्रत्येक व्यक्तीला “जमीन वाचवा, जीवन वाचवा” या महत्त्वकांक्षी चळवळीचा भाग बनणे आवश्यक आहे. म्हणूनच इरिच इंटल इंडिया लि. ही कंपनी जनतेमध्ये याविषयी विविध स्तरांवर, विविध माध्यमांतून जनजागृती करित आहे. या बरोबरच शेतीचे व पशुधनाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी सेंद्रिय व आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेल्या उच्च दर्जाच्या सहा उत्पादनांची निर्मिती केली गेली आहे. ही उत्पादने यशस्वी ठरण्यामागे गेल्या वीस वर्षांचा कालखंड लोटला गेला आहे. तसेच ही उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याआधी विविध ठिकाणच्या विविध वातावरणामध्ये ट्रायल सुद्धा घेतल्या गेल्या आहेत. सध्या या प्रॉडक्टची पेटंट प्रक्रियाही सुरू आहे.
धोनी झाला शेतकरी, तब्बल दोन वर्षांनी पोस्ट करत सर्वांनाच दिला धक्का
या उत्पादनाच्या वापरामुळे रसायनमुक्त शेती तर होईलच, परंतु मानवी आरोग्य अबाधित
राखण्यासाठी खूप मदत होईल. केमिकलचे मानवी शरीरावर होणारे घातक परिणाम लक्षात घेता ग्राहकांचा कल सेंद्रिय उत्पादने खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे येत्याकाळात सेंद्रिय उत्पादनाला भयंकर मागणी वाढणार असून रासायनिक पद्धतीने निर्माण केलेली दूध, फळे, भाजीपाला, अन्नधान्य विकलेही न जाण्याचे असे भाकीत कंपनीचे संचालक श्री. प्रदीप शेळके यांनी केले आहे. त्यामुळे रायायनिक शेतीमुळे एक ना एक दिवस शेतकऱ्याला नुकसानाला सामोरे जावे लागेल. चला तर मग, आपली जमीनही नापीक होण्यापासून वाचवूया आणि “जमीन वाचवा, जीवन वाचवा” या चळवळीत सहभागी होऊया.
कंपनीची उद्दिष्टे-
एक कोटी एकर शेती सेंद्रिय करणे.
विषमुक्त अन्न तयार करणे.
रोजगार उपलब्ध करून देणे.
सेंद्रिय शेतीबाबत प्रबोधन करणे.
शेतीसह मानवी व पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे.
शेतकऱ्यांना रोजगाराच्या विविध संधी-
डीलर व डिस्ट्रीब्यूटर होण्याची संधी.
बिजनेस पार्टनर बनण्याची संधी.
कृषी सल्ला मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी.
सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षक बनण्याची संधी.
कंपनीची उद्दिष्टे-
एक कोटी एकर शेती सेंद्रिय करणे.
विषमुक्त अन्न तयार करणे.
रोजगार उपलब्ध करून देणे.
सेंद्रिय शेतीबाबत प्रबोधन करणे.
शेतीसह मानवी व पशुधनाचे आरोग्य अबाधित राखणे.
शेतकऱ्यांना रोजगाराच्या विविध संधी-
डीलर व डिस्ट्रीब्यूटर होण्याची संधी.
बिजनेस पार्टनर बनण्याची संधी.
कृषी सल्ला मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी.
सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षक बनण्याची संधी.
नियोजन उन्हाळी भुईमूग हंगामाचे
पशुधनाच्या उत्तम आरोग्यासाठी ऑल इन वन सोल्युशन- मॅजिक-24
दूध उत्पादन व फॅट वाढीसाठी.
गाभाच्या व माजाच्या तक्रारीसाठी.
जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी
जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी.
उद्योजकांबद्दल थोडेसे-
श्री. प्रदीप शेळके
शिक्षण- बी. एस.सी. बॉटनी
अनुभव २५ वर्ष
पद / हुद्दा- चेअरमन- इरिच इंटल इंडिया लिमिटेड
मोबाईल नं- ९१७२२३७३७७
इमेल-pmshelke123@rediffmail.com
वेबसाईट- www.erichindia.com
पत्ता-
गोडाऊन नं. 6, एस. नं. 141/2/1,
पवार वस्ती, थाठवाडे, ता.- मुळशी जि.- पुणे - 411033
जाहिरात-
1) पशुधन मिल्किंग मशीन
पशुधन मिल्किंग मशीन ऑर्डर करण्यासाठी कॉल करा.
मो. नं. - ८२०८५२०९४१
2) दिपकार
देशी गाईच्या शेणापासून दिवे बनवण्याची मशीन
पकार मशीन ऑर्डर करण्यासाठी आजच या नंबरवर कॉल करा.मो. नं. 9130233557, 7499944628
टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
शेतीबद्दल सकारात्मक विचार गरजेचा
शेतकऱ्यांनो हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो? जाणून घ्या..
गहू काढणीसाठी 'हे' छोटे कृषी यंत्र ठरतंय खूपच फायद्याचं, वेळ आणि पैसाही वाचतोय
Published on: 13 February 2023, 11:42 IST