Agriculture Processing

उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स वेफर्स मध्येही अनेक पर्याय आढळून येतात.

Updated on 07 May, 2022 8:14 PM IST

 उपवास असो किंवा संध्याकाळच्या वेळी लागलेली छोटी भूक पटकन खाता येणारा पदार्थ म्हणजे वेफर्स वेफर्स मध्येही अनेक पर्याय आढळून येतात.

 त्यातल्या त्यात सर्वांना आवडणाऱ्या वेफर्स म्हणजे केळी वेफर्स प्रवासादरम्यान मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी किंवा मग चहा सोबत खाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे केळी वेफर्स अनेकदा बाजारातून विकत आणून वेफर्स खाल्ले जातात. परंतु तळण्यासाठी लागणारे तेल, वेफर्स बनविण्यासाठी जागा याबाबत आपल्या मनात अनेक शंका-कुशंका उपस्थित होतात. त्यामुळे आपण वेफर्स खाणंच टाळतो. अशावेळी वेफर्स घरी तयार करणे हा उत्तम पर्याय आहे. अगदी सहज आणि कमी वेळात या वेफर्स तुम्ही घरी तयार करू शकता.

केळीचे चिप्स बनविण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे मशनरी वापरली जाते. त्यामध्ये कच्ची केळी मीठ खाद्यतेल आणि काही प्रकारचे मसाले कच्चामाल म्हणून यात वापरले जाते.

1) केळी वेफर्स व्यवसायासाठी लागणारी मशनरी कोणती?

1) केळी सोलण्याची मशीन आणि वाशिंग ट्रॅक

2) कटिंग मशीन

3) फ्रायींग मशीन

4) पाऊच प्रिटींग मशीन

5) प्रयोगशाळा उपकरणे इत्यादी मशनरी ची या उद्योगांमध्ये गरज भासते.

2) केळी वेफर्स व्यवसायासाठी लागणारी मशिनरी कुठे खरेदी करणे शक्य आहे?

 केळी वेफर्स व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही https//www.indiamart.com वरून मशीन खरेदी करू शकता. ही मशनरी अंदाजे आपल्याला 28,000 ते 50,000 रुपयापर्यंत मिळतात.

 ही मशिनरी ठेवण्यासाठी कमीत - कमी आपल्याला 4 हजार ते 5 हजार स्क्वेअर फिट  जागेची आवश्यकता असते.

3) सुरूवातीला 50 किलो केळी चिप्स बनवण्यासाठी किती खर्च येतो?

 केळी वेफर्स व्यवसायासाठी 120 किलो कच्ची केळी त्यासाठीचा खरेदी कर्ज सुमारे 1000 रुपये असतो. त्यासाठी आपणास 12 ते 15 लिटर खाद्यतेल लागते. तेलाची किंमत अंदाजे 1000 रुपये असते. चिप्स फ्राईंग मशीनला दर ताशी 10 ते 11 लिटर डिझेल लागते. 11 लिटर च्या हिशेबाने ते1000 रुपये होतात. मीठ आणि मसाले तीन हजार रुपयांमध्ये तयार होतील.

 जर एक किलोच्या पॅकेट ची किंमत पॅकिंग सह 70 रुपये असेल. जी आपण ऑनलाईन किंवा दुकानातून 90 किंवा 100 रुपये किलोने विकू शकतो.

यामध्ये आपण जर एक किलो पाठीमागे 10 रुपयाचा प्रॉफिट पकडला तर आपण दिवसाला 4000 रुपयांचा नफा कमवू शकतो. आणि महिन्याला आपण 1 लाखापर्यंत पैसे या व्यवसायातून कमवू शकतो.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Nagpur Orange: यावर्षी नागपूरची संत्री हाताला गावणार नाही; वाढत्या तापमानात अन ब्लॅक फंगसमुळे बागा क्षतीग्रस्त

नक्की वाचा:…अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळाला! 510 कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा; साडेतीन लाख शेतकऱ्यांचा फायदा

नक्की वाचा:असा कसा हा आडमुठेपणा! लिलाव झाला तरी कांदा घेणव्ऱ्याची टंगळमंगळ; अखेर शेतकऱ्याने केली कंप्लेंट अन…..

English Summary: a making banana wafers is so profitable business for unemployment person
Published on: 07 May 2022, 08:14 IST