1. हवामान

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात वाढ; पाहा पुढील २ दिवस कसे राहणार वातावरण?

Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम ३० जानेवारीपासून सलग दोन दिवस वायव्य भारतावर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३ फेब्रुवारीपासून जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये हलका ते मध्यम हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. IMD च्या अहवालानुसार, ३० आणि ३१ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस-बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका/मध्यम विखुरलेला पाऊस/हिमवृष्टी आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather News Update

Weather News Update

Weather News : देशातील गारठा आता काही अंशी कमी होताना दिसत आहे. याचबरोबर राज्यातील तापमानात देखील वाढ होऊ लागल्याने गरमीचे वातावरण निर्माम झाले आहे. मात्र राज्यातील काही भागात गारठा अद्यापही कमी आहे. येत्या ४८ तासात राज्यातील वातावरणात बदल होऊन गारठा कमी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

थंडी कमी होण्यास सुरुवात

देशभरातील हवामानाचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. भारतातील काही राज्यांमध्ये दिवसा चांगला सूर्यप्रकाश आहे. तर काही राज्यांमध्ये दिवसा थंडीचा कहर सुरूच असतो. आता दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या राज्यांमध्ये थंडी हळूहळू कमी होताना दिसत आहे. अशा स्थितीत मैदानी भागातील अनेक भागात किमान तापमान ६ ते ९ अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.

राजस्थान आणि बिहारच्या अनेक भागात तापमान सामान्यपेक्षा ३-६ अंश सेल्सिअस कमी राहू शकते. IMD ने पुढील ७ दिवसांत मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात हलक्या पावसासह हिमवृष्टीचा इशारा दिला आहे.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम ३० जानेवारीपासून सलग दोन दिवस वायव्य भारतावर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच ३ फेब्रुवारीपासून जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये हलका ते मध्यम हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. IMD च्या अहवालानुसार, ३० आणि ३१ जानेवारी रोजी काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस-बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. ३१ जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी हलका/मध्यम विखुरलेला पाऊस/हिमवृष्टी आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

English Summary: Maharashtra Weather Update Rise in temperature in state See how the weather will be for the next 2 days Published on: 29 January 2024, 10:23 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters