1. हवामान

शेतकऱ्यांनो काळजी घ्या; पुढील चार दिवस महत्वाचे,13 जिल्ह्यांमध्ये जारी केला यलो अलर्ट

रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात सर्वत्र ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी

Yellow Alert : रखरखत्या उन्हाचा तडाखा सोसल्यानंतर आता सर्वचजण पावसाची वाट बघत आहेत. मात्र जून महिना उजाडला तरी राज्यात सर्वत्र ऊनच आहे. पोषक वातावरण असल्यामुळे यंदा राज्यात वेळेत तसेच चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने लावला होता. मात्र तसं काही घडलं नाही. उलट पाऊस लांबणीवर गेल्याचं दिसत आहे. शेतकरी वर्गाने तर पाऊस वेळेत पडेल या आशेवर खरिपाची सर्व तयारीदेखील केली.

मात्र आता हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, परभणी, पुणे, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने 6 ते 9 जूनपर्यंत या 13 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

6 जून ते 9 जून या दरम्यान काही भागांमध्ये हवेचा दाब किंचित कमी होत असल्यामुळे राज्यातील 13 जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने या जिल्ह्यातील लोकांना सुरक्षित राहण्याचा सूचनादेखील जारी केल्या आहेत.

कौतुकास्पद: काळ्या आईची सेवा केल्यामुळे शेतकऱ्याला थेट बांधावरच मिळाला पुरस्कार

राज्यात अजूनही उष्णतेची लाट
सर्वसाधारणपणे 22 मे पर्यंत अंदमानमध्ये मान्सून दाखल होतो. मात्र यंदा हा मान्सून 16 मे रोजीच दाखल झाला. तसेच केरळमध्येही मान्सून चार दिवस अगोदर दाखल झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मात्र मान्सूनचा वेग अरबी समुद्रात आल्यानंतर मंदावला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा महाराष्ट्रातील प्रवेशाला अडथळा निर्माण झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत.

22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या म्हणण्यानुसार, 22 जूनपर्यंत संपूर्ण देशात पाऊस पडेल. माढा तालुक्यातील मानेगाव येथे सुभेदार गणेश लांडगे यांच्या सैन्य सेवापूर्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात पंजाबराव डख बोलताना म्हणाले गेल्या तीन वर्षापासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. याच कारण म्हणजे मान्सून पूर्वेकडून येत आहे. जेव्हा मान्सून पूर्वेकडून येतो तेव्हा पाऊस जास्त पडतो. यावर्षीही मान्सून पूर्वेकडून आला असल्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण जास्त असणार असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:
आता तासंतास नंबरला बसण्याची गरज नाही; फिरत्या सलूनची होतीये राज्यभर चर्चा
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; विकास महामंडळाचा मोठा निर्णय

English Summary: Farmers take care; Yellow Alert issued in 13 districts Published on: 06 June 2022, 03:48 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters