1. यशोगाथा

Successful Farmer : फक्त पाच एकरात घेतले सुमारे 125 टन खरबूजचे उत्पादन

शेती हा व्यवसाय जोखीम पूर्ण असला तरी अनेकदा या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा कमवत असतात. मात्र शेतीमध्ये योग्य नियोजन करणे अति महत्त्वाचे ठरते. पुण्यातील एका शेतकऱ्याने योग्य नियोजन करत व नियोजनाला मेहनतीची सांगड घालत खरबूज पिकातून चांगले बक्कळ उत्पादन मिळवले आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मौजे मांडवगण फराटा येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याने केवळ 5 एकरात 125 टन विक्रमी उत्पादन मिळवले आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
muskmelon farming

muskmelon farming

शेती हा व्यवसाय जोखीम पूर्ण असला तरी अनेकदा या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी बांधव चांगला बक्कळ पैसा कमवत असतात. मात्र शेतीमध्ये योग्य नियोजन करणे अति महत्त्वाचे ठरते. पुण्यातील एका शेतकऱ्याने योग्य नियोजन करत व नियोजनाला मेहनतीची सांगड घालत खरबूज पिकातून चांगले बक्कळ उत्पादन मिळवले आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्याच्या मौजे मांडवगण फराटा येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याने केवळ 5 एकरात 125 टन विक्रमी उत्पादन मिळवले आहे.

उच्चशिक्षित असून देखील शेतकरी अक्षय दादा पाटील फराटे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि खरबूज पिकाची लागवड करत अवघ्या पाच एकरात 125 टन विक्रमी उत्पादन मिळवण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या अक्षय दादा पाटील फराटे पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय ठरत आहेत.

अक्षय यांनी उच्चशिक्षण घेतले असले तरी देखील शेतीची लहानपणापासून आवड होती त्यामुळे त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने त्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा दिला आणि नगदी पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये त्यांनी केलेला हा बदल त्यांच्यासाठी निश्‍चितच फायदेशीर ठरला आहे. विशेष म्हणजे अक्षय यांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले व यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला. पाण्याचा अपव्यय वापर यामुळे टाळता आला असल्याचे अक्षय यांनी सांगितले.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, अक्षय यांनी एकूण पाच एकर क्षेत्रात खरबूज पिकाची लागवड केली या साठी अक्षय यांनी सुमारे 34 हजार खरबूज रोपांची आवश्यकता भासली होती. अक्षय यांनी पाच एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यात दोन टप्प्यात खरबूज पिकाची लागवड केली. खरबूज पिकाची लागवड करण्यापूर्वी अक्षय यांनी पूर्व मशागत यावर विशेष लक्ष केंद्रित केले होते.

अक्षय यांच्या मते पूर्वमशागत सर्व व्यवस्थित झाले तर पिकातून चांगले उत्पादन प्राप्त केले जाऊ शकते. या अनुषंगाने त्यांनी जमिनीची पूर्वमशागत केल्यानंतर बेड तयार केले. एवढे केल्यानंतर मल्चिंग पेपर अंथरून ठिबक सिंचन प्रणाली साठी यंत्रणादेखील त्यांनी वापरली.

लागवड केल्यानंतर खतांचे योग्य व्यवस्थापन केले तसेच पूर्वमशागत नंतर त्यांनी शेणखताचा देखील वापर केल्याचे सांगितले. अवघ्या साठ दिवसात खरबुजाचे पीक तयार झाले असून आता ते मुंबई वाशिम मार्केट मध्ये विक्रीसाठी पाठवले जात आहेत. सध्या त्यांच्या खरबूज पिकाला 20 ते 25 रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे.

English Summary: Successful Farmer: About 125 tons of melon grown in just five acres Published on: 24 April 2022, 04:04 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters