1. यशोगाथा

Success Story : १२ एकरातून ३२ एकराकडे; अवलिया शेतकऱ्याची कहाणी

काकुस्ते नेहमी प्रयोगशील शेती करत असतात. म्हणजे नगदी पिके घेतात. त्यात जर यश आले तर पुढे सातत्य ठेवायचे अपयश आले तर काहीतरी शिकायचे. शेतीत बरीचशी पीक घेतली. त्यात डाळिंब, कांदा, कापूस, ऊस, भेंडी, घेवडा, दुधी भोपळा, टरबूज, पपई, मिरची, टोमॅटो, कारले, मका अशी पिके मार्केटचा अंदाज बघून ते करतात.

Success Story

Success Story

पित्रु छत्र हरपल्यानंतर वयाच्या १३ वर्षी राकेश गोरखराव काकुस्ते (शेणपूर, ता. साक्री, जि. धुळे) यांच्यावर शेतीची जबाबदारी पडली. शेतीची आवड तशी लहान पणापासून होती. वडील असतानाच शेतीची आवड निर्माण झाली. प्रामाणिक पणाने शेती करत कमी वयात खुप अनुभव आले. खुप संकटे पण आली. पण प्रत्येक संकट खुप काही शिकवून गेलं. त्या संकटांना न घाबरता त्यातून काहीतरी शिकून वाटचाल आणि प्रगती केली.

प्रगतशील शेती आणि त्यातील पिके
काकुस्ते नेहमी प्रयोगशील शेती करत नगदी पीके घेतात. त्यात जर यश आले तर पुढे सातत्य ठेवायचे अपयश आले तर काहीतरी शिकायचे. शेतीत बरीचशी पीक घेतली. त्यात डाळिंब, कांदा, कापूस, ऊस,  भेंडी,  घेवडा,  दुधी भोपळा, टरबूज, पपई, मिरची, टोमॅटो, कारले, मका अशी पिके मार्केटचा अंदाज बघून ते करतात.

आईच्या मार्गदर्शनाने १२ एकरातून ३२ एकर
आईच्या मार्गदर्शनाने आणि अपार कष्ट आणि नियोजनाच्या जोरावर १२ एकर शेतीतून आज ३२ एकर शेती स्वताचा बंगला गाडी शेतीसाठी लागणारे सर्व अवजारे, ट्रॅक्टर हे सर्व आहे. मी माझ्या शेतीत जे पीक लावतो ते करत असताना नेहमी नफा भेटतो असे नाही काही वेळा अस्मानी संकटामुळे किंवा सुलतानी संकटानंमुळे तोटाही सहन करावा लागतो. पण अशा परिस्थितही न डगमगता हा तोटा पुढच्या पिकात कसा भरून निघेल हा प्रयत्न असतो. 

तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर जोर असतो. माझा नेहमी एकच प्रयत्न असतो की आपल्या जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल आणि सुपीकता टिकवण्यासाठी मी तसे प्रयत्न ही करत असतो ते म्हणजे पिक काढल्यानंतर आपल्या पिकांचे बाकी  अवशेष जमिनीतच गाडायचे. तसेच हिरवळीची खते उपलब्ध करणारी पिके लावणे आणि रासायनिक खतांचा वापर अगदी कमी (३० ते ४० टक्के) प्रमाणात करायचा. त्याच प्रमाणे जैविक स्लरीचा वापर करायचा त्यात शेण गोमूत्र बेसन पीठ यांचा वापर करून स्लरी देत असतो.

जमीन तंदुरुस्त तर पिक तंदुरुस्त मग शेतकरी राजाही तंदुरुस्त काळ्या आईची निगा ही खुप गरजेची आहे. माझ्या शेतात जे पिक करतो ते ठरवलेल्या तारखेत लागण व्हायलाच पाहिजे.

पिकांचे नियोजन खालीलप्रमाणे
१) गेल्या २४ वर्षांपासून कांदा लागवड - जास्तीत जास्त १५ डिसेंबर पर्यंत
२) गेल्या १५ वर्षांपासून पपई लागवड -  २१ मार्च तर ३० एप्रिल पर्यंत
३) गेल्या २१ वर्षांपासून मिरची लागवड -  १५ एप्रिल ते १० मे
४) गेल्या ९ वर्षांपासून टोमॅटो लागवड - १५ मे तर १० जून
५) गेल्या २२ वर्षांपासून कापूस लागवड - १५  मे ते २५  मे
६) गेल्या १० वर्षांपासून कारले लागवड - मार्च किंवा सप्टेंबर महिन्यात
७) ऊस फक्त पूर्व हंगामीच करतो. ऊस लावण्याचे मेन कारण म्हणजे एकमेव गारपिट जास्त पाऊस. ऊस शेतीत एकरी कमीत कमी ४५ टन तिडवा ८४ टन पर्व हंगामी आला पाहिजे असे माझे मत आहे.
८) १५ जानेवारी ते ३० जून पर्यंत -  भेंडी, दुधी, गिल्के,  दोडके,  गवार,  काकडी,  घेवडा अशी पिके मार्केट अंदाज बघून करत असतो.
९) गेल्या ८ ते १० वर्षांपासून जानेवारी ते एप्रिल टरबूज लागवड करतो. त्याचप्रमाणे १ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत ही वातावरणाचा अंदाज बघून टरबूज लागवड करतो.

खत नियोजन
रासायनिक खतांचे नियोजन तसे कमीच असते. शेणखते, हिरवळीचे खते कोंबडी खते असे नियोजन असते. कितीही मोठी संकटे आली. कितीही नुकसान झाले असेल अशा परिस्थितीत माझी आई आणि पत्नी नेहमी माझ्या पाठी खंबीर पणे उभ्या राहून मला बळ देत असतात. माझ्या प्रगतीत माझ्या आईचा आणि पत्नीचा खुप मोठा वाटा आहे.  माझे टारगेट असते. एक म्हणजे वेळचे. वेळेचे काम हे वेळेवर केले पाहिजे.

नफा चांगला
शेतातून मला कमीत कमी एकरी १ लाख निवळ नफा मिळाला पाहिजे. असे नियोजन असते. म्हणजे सर्व खर्च काढून सर्व पिक धरून वर्षाकाठी  १४ ते १५ वर्षापासून मिळवत आहे. फक्त जून २०२२ ते जून २०२३ हे वर्ष वाईट गेले. ८ पिकात नफा जेमतेम मिळाला.

यावर्षी सर्वदूर पाण्याची मोठी समस्या आहे. पाण्याचे काटेकोरपणे नियोजन व नगदी पिकांचे नियोजन केले तर चांगला पैसा भेटू शकेल. मार्च नंतर देशी वांगी, टोमॅटो,  दोडका, मिरची आणि घेवडा करणार आहे. पुन्हा एकदा विनंती करून सांगतो की आपल्या परिवाराप्रमाणे आपल्या मातीलाही जपा जास्तीत जास्त सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न करा. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवा. आपले उत्पादन कधीच कमी होणार नाही.

English Summary: Success Story From 12 acres to 32 acres The Story of Avaliya Farmer Published on: 13 November 2023, 11:38 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters