1. यशोगाथा

गुजरातच्या मेहुलभाई वाढविला डेअरी फॉर्मचा व्यवसाय; दुधाबरोबर सुरू केला मिठाईचा व्यवसाय

डेअरी व्यवसायातून लक्ष्मी आपल्या घरी येत असते परंतु सर्वांचा या व्यवसायात यश येतं असं नाही. डेअरी व्यवसायात मिळण्यासाठी आपल्याकडे योग्य नियोजन असणं आवश्यक असते. आज आम्ही आपल्याला अशाच एका गुजरातमधील डेअरी व्यवसायिकांची ओळख करून देणार आहोत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

डेअरी व्यवसायातून लक्ष्मी आपल्या घरी येत असते परंतु सर्वांचा या व्यवसायात यश येतं असं नाही. डेअरी व्यवसायात मिळण्यासाठी आपल्याकडे योग्य नियोजन असणं आवश्यक असते. आज आम्ही आपल्याला अशाच एका गुजरातमधील डेअरी व्यवसायिकांची ओळख करून देणार आहोत.

या व्यावसायिकाचे नाव आहे, मेहुलभाई सुतारिया यांनी 2018 मध्ये हरिबा डेअरी फार्मची स्थापना केली. गुजरात सरकारने त्यांना यावर्षाचा तालुकास्तरीय सर्वक्षेष्ठ पशुपालन पुरस्काराने सन्मानित केलं आहे. सुतारिया यांच्या शेतात जवळ-जवळ दुध देणारे 72 जनावरे आहेत. यातून ते दर महिन्यााल साधरण 600 ते 700 लिटर दुधाचे उत्पादन घेत असतात.आपल्या व्यवसायाविषयी सांगताना 32 वर्षीय मेहुलभाई म्हणाले की, आम्ही हा व्यवसाय कोणत्या व्यवसाय म्हणून सुरू केला नव्हता. परंतु सेवानिवृत्तीनंतर डेअरी सुरू करावी अशी इच्छा होती. जर तुम्ही डेअरी व्यवसाय करणार असाल तर सुरुवातीला 10 गायींचं पालन करू शकतात. आम्ही याच निश्चयावर आमच्या गावात डेअरी फार्मिग सुरू केली.

डेअरी फार्मची स्थापनेच्या आधी मी नेस्दा-गीर क्षेत्रात गेलो आणि काही गीर गायी आणल्या. यासाठी आपण आधी खूप शास्त्रज्ञांशी मी चर्चा केली, त्यांचं मार्गदर्शन केल्यानंतर साधरण एका वर्षानंतर 2018 मध्ये मी डेअरी फार्म सुरू केलं"

गुरांची काळजी कशी घ्यावी:

मेहुलभाईंनी गायीच्या गोठ्यात गायी सिमेंटच्या फरशीऐवजी दगडासारख्या मातीच्या फरशी बसवली आहे. दूध काढण्यासाठी मशीनचा उपयोग करण्याऐवजी मजूर लोकांना लावून त्यांच्या हाताने दूध काढलं जातं.ते म्हणाले की, गोशाळेत वर्षातून तीनदा माती भरली जाते आणि गायींच्या चाऱ्यासाठी 30 बिघा जमिनीवर सेंद्रिय चाऱ्याची लागवड केली जाते. गायींच्या वासरांना दूध काढण्यापूर्वी पाजले जाते,

 

हरिबा डेअरी फार्म्स कोणती उत्पादने बनवतात?

मेहुलभाईंना त्यांच्या फॉर्ममध्ये कोणती उत्पादने बनवली जातात, असे विचारले असता ते म्हणाले, "सुरुवातीला आमचा कोणताही अन्य उत्पादने विक्रीसाठी बनवण्याचा विचार नव्हता."मात्र, कालांतराने आम्ही तूप बनवायला सुरुवात केली. तेव्हा जवळच्या मित्राने कामावर असलेल्या सहकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी मिठाई देण्याचं ठरविले. त्या मिठाई बनविण्यासाठी आणि तूप मागितले. मिठाई बनवण्यासाठी खजूर आणि पिस्ता वापरला जात असे. मग कालांतराने आदिया पाकने मोहनथाल सारख्या मिठाई बनवायला आणि विकायला सुरुवात केली.

उत्पादनांबद्दल त्यांचे ग्राहक रमेश सवानी सांगतात, “पूर्वी आम्ही इतर कंपन्यांची उत्पादने वापरायचो, पण जेव्हा आम्ही पहिल्यांदा हरिबा उत्पादनांचा आस्वाद घेतला तेव्हा आम्हाला ते खूप आवडले. चव किंवा दर्जाच्या बाबतीत तुलना नाही. मी त्यांच्या शेताला भेट दिली आणि गायींची कशी काळजी घेतली जाते ते पाहिले. त्यांच्या गायींची अवस्था चांगली आहे. त्यामुळे त्यांचे दुग्धजन्य पदार्थ चांगले आहेत."
आणखी एक ग्राहक, ख्याती त्रिवेदी म्हणतात, "मला हरिबाचे तूप आवडते. ते ग्राहकांना केवळ उच्च दर्जाची उत्पादनेच पुरवत नाहीत तर ते नेहमी वेळेवर वितरीत करतात."स्थानिक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मेहुलभाईंना दुग्धव्यवसायाचा मार्ग दाखवला. स्वत:साठी गोष्टी सोप्या व्हाव्यात यासाठी त्यांनी एक वेबसाइटही सुरू केली आहे.

 

वीज समस्या

गावापासून केवळ ३०० मीटर अंतरावर मेहुलभाईंचे डेअरी फार्म असूनही त्यांना ग्राम ज्योती योजनेंतर्गत विजेचा लाभ मिळू शकलेला नाही. ते आता स्वतंत्र कृषी विजेवर अवलंबून आहेत, जी दररोज केवळ काही तासांसाठी उपलब्ध आहे. वादळ आले की गावांना त्वरित वीज मिळते, मात्र ४५ दिवस शेतात वीज आली नाही, त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

गावातील 80% कुटुंबांना डेअरी फॉर्ममधून पाणी पुरविले जाते

आपल्या गावात पाण्याचे गंभीर संकट असल्याचा मेहुलभाईचा दावा आहे. जेव्हा मी पहिल्यांदा दुग्धव्यवसाय सुरू केला तेव्हा शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी मी बोअरवेल बांधली. ही बाब शेतकऱ्यांना समजताच त्यांनी पाण्याच्या शोधात शेताकडे धाव घेतली.
शेतकऱ्यांची मागणी पाहून मेहुलभाईंनी स्वखर्चाने 25000 लिटर क्षमतेची टाकी तयार करून ती शेताच्या नळाला जोडली. लोकांना आता सहज पाणी वाहून नेता येते.

English Summary: Mehulbhai of Gujarat expands dairy farm business; Started confectionery business with milk Published on: 28 November 2021, 09:18 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters