1. यशोगाथा

कर्जात डुबलेले शेतकरी ते पद्मश्री! जाणुन घ्या आदर्श शेतकरी पद्मश्री कंवल सिंह चौहान यांचा प्रेरणादायी प्रवास.

भारत ही चमत्काराची भूमी असे म्हटले जाते आणि हे नक्कीच खरं आहे असच म्हणावं लागेल. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो, ह्याचे महत्वाचे कारण असे की भारताची जिडीपी ही पूर्णतः शेतीवरच अवलंबून आहे. साहजिकच कृषी क्षेत्रात आपला देश रोजच नवीन विक्रम आपल्या नावावर करत असतो. आपल्या देशाचा कणा म्हणुन ओळखला जाणारा आपला शेतकरी राजा आपले नावलौकिक करत असतो. आज आपण अशाच एका नांदखुळा शेतकऱ्यांचा जीवनप्रवास कथन करणार आहोत. ते प्रगतीशील शेतकरी म्हणजेच पद्मश्री कंवल सिंह चौहान

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
padmshri kanwal sing chavhan

padmshri kanwal sing chavhan

भारत ही चमत्काराची भूमी असे म्हटले जाते आणि हे नक्कीच खरं आहे असच म्हणावं लागेल. आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणुन ओळखला जातो, ह्याचे महत्वाचे कारण असे की भारताची जिडीपी ही पूर्णतः शेतीवरच अवलंबून आहे. साहजिकच कृषी क्षेत्रात आपला देश रोजच नवीन विक्रम आपल्या नावावर करत असतो. आपल्या देशाचा कणा म्हणुन ओळखला जाणारा आपला शेतकरी राजा आपले नावलौकिक करत असतो. आज आपण अशाच एका नांदखुळा शेतकऱ्यांचा जीवनप्रवास कथन करणार आहोत. ते प्रगतीशील शेतकरी म्हणजेच पद्मश्री कंवल सिंह चौहान

पद्मश्री कंवल सिंह चौहान हे हरियाणा राज्याच्या सोनिपत जिल्ह्यातील अटेंरणा गावाचे रहिवाशी आणि एक आदर्श शेतकरी आहेत. त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात त्याची ख्याती एक क्रांतिकारक शेतकरी म्हणून आहे,  तसेच सरकारने त्यांना The Father of Baby Corn असे नामकरणच केले आहे. लोक त्यांचा एवढा गुणगौरव करतात यांच प्रमुख कारण असे की त्यांनी शेतकऱ्यांना या भागात स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न आणि मशरूमची लागवड सुरू करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. लोकांचा मान-सन्मान तर त्यांना मिळतोच पण त्यांना शेतीच्या क्षेत्रात योगदानाबद्दल साल 2019 मध्ये आपल्या भारताच्या महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून पद्मश्री सन्माणाने सन्मानित करण्यात आले.

 

 

 

आसपासच्या युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून दिला

पद्मश्री कंवल चौहान वयाच्या 15 व्या वर्षापासून शेती करत आहेत. ते घरात सर्वात मोठे होते आणि लहान वयात त्याच्या वडिलांची सावली डोक्यावरून उठल्यावर साहजिकच घराची जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली.

एक काळ होता जेव्हा कंवल चौहान कर्जबाजारी शेतकरी होते पण आज ते आदर्श शेतकरी म्हणून उदयास आले आहेत आणि सुमारे 200 लोकांना प्रत्यक्ष रोजगार देत आहेत.

 सन 1998 मध्ये पहिल्यांदा मशरूम आणि बेबी कॉर्नची लागवड करण्यासाठी कंवल सिंह यांनी पारंपारिक शेती सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला. दोन्ही पिकांनी चांगला नफा मिळवुन दिला. यानंतर मात्र स्थिती बदलली आणि ते परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनलेत.

 इंग्लंड आणि अमेरिका निर्यात करतात आपला शेतमाल

जेव्हा त्यांच्या गावात बेबी कॉर्न आणि स्वीट कॉर्नचे उत्पादन वाढले, तेव्हा कंवल सिंह यांनी 2009 मध्ये अन्न प्रक्रिया युनिट सुरू केले. जेणेकरून शेतकऱ्यांना बाजाराच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही,

सुमारे दोन एकरमध्ये असलेल्या या युनिटमध्ये बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न, मशरूम बटण, मशरूम स्लाइससह सुमारे आठ प्रकारची उत्पादने तयार केली जातात. या युनिटच्या मदतीने इंग्लंड आणि अमेरिकेत दररोज सुमारे 1.5 टन बेबी कॉर्न आणि इतर उत्पादने निर्यात केली जात आहेत. यासह, कंवल सिंहजी येथे टोमॅटो, स्ट्रॉबेरीची प्युरी देखील तयार करत आहेत.

 

English Summary: inspired journy of farmer kunvar sing chavhan Published on: 20 September 2021, 06:37 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters