1. इतर बातम्या

टीम इंडियाच्या या तीन धुरंदर खेळाडूची कारकीर्द संपुष्टात; बीसीसीआयने दिले 'हे' आदेश

भारतीय क्रिकेट टीम सध्या युवा पर्वाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट टीम मध्ये मोठी स्पर्धा आणि ओढाताण बघायला मिळत आहे, यामुळे भविष्यात भारतीय क्रिकेट टीम मधील तीन धुरंदर खेळाडूंची अभूतपूर्व कारकीर्द संपू शकते. युवा प्रतिभावान खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम मधील एका काळी दिग्गज असलेले तीन मोठ्या प्रतिभावंत खेळाडूंना टीम बाहेर करण्याची तयारी सुरु असल्याचे समजत आहे. भारतीय संघाचा प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या देशासाठी देशाकडून खेळला जाणारा प्रत्येक सामना खेळू इच्छित असतो, परंतु असे असले तरी प्रत्येक गोष्टीला अंत असतो त्याप्रमाणेच क्रिकेटच्या करियर मध्ये देखील अंत आहे. अनेक खेळाडू आपल्या क्रिकेटच्या करियर मध्ये अनेक चढ-उतार चा सामना करत असतात आणि ठराविक खेळाडू देशाकडून आपल्या निवृत्तीपर्यंत सलग खेळताना बघायला मिळतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
image credit rediff

image credit rediff

भारतीय क्रिकेट टीम सध्या युवा पर्वाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. भारतीय क्रिकेट टीम मध्ये मोठी स्पर्धा आणि ओढाताण बघायला मिळत आहे, यामुळे भविष्यात भारतीय क्रिकेट टीम मधील तीन धुरंदर खेळाडूंची अभूतपूर्व कारकीर्द संपू शकते. युवा प्रतिभावान खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी भारतीय क्रिकेट टीम मधील एका काळी दिग्गज असलेले तीन मोठ्या प्रतिभावंत खेळाडूंना टीम बाहेर करण्याची तयारी सुरु असल्याचे समजत आहे. भारतीय संघाचा प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या देशासाठी देशाकडून खेळला जाणारा प्रत्येक सामना खेळू इच्छित असतो, परंतु असे असले तरी प्रत्येक गोष्टीला अंत असतो त्याप्रमाणेच क्रिकेटच्या करियर मध्ये देखील अंत आहे. अनेक खेळाडू आपल्या क्रिकेटच्या करियर मध्ये अनेक चढ-उतार चा सामना करत असतात आणि ठराविक खेळाडू देशाकडून आपल्या निवृत्तीपर्यंत सलग खेळताना बघायला मिळतात.

आज आपण भारतीय क्रिकेट टीमच्या तीन अशा प्रतिभावंत खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांचे करियर आगामी काही दिवसात संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या तीन बड्या खेळाडूंची हाकलपट्टी होणार या चर्चेला उधाण तेव्हा आले जेव्हा बीसीसीआयच्या एका बड्या अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, टीम इंडियाच्या निवड समितीला काही नवीन युवा प्रतिभावंत चेहऱ्यांना संधी द्यायची आहे, सिलेक्टरसने वैयक्तिकरीत्या खेळाडूंना याबाबत माहिती देखील दिली आहे. टीम इंडियाचे वर्तमान कोच राहुल द्रविड आणि इतर बीसीसीआयच्या सदस्यांशी बोलणी केल्यानंतर हा निर्णय घेतला गेला असल्याचे समजत आहे.

अजिंक्य रहाणे

बीसीसीआयचे वर्तमान अध्यक्ष सौरभ दादा यांनी राहणेला ड्रॉप करण्याचे संकेत दिले आहेत. टीम इंडिया मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात भिडणार आहे, या दोन्ही कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला स्थान मिळणार नसल्याची दाट शक्‍यता असल्याचे सांगितले जात आहे. अजिंक्य रहाणे यांची फलंदाजी गेल्या अनेक दिवसांपासून काही विशेष कमाल करू शकलेली नाही त्यामुळे त्यांना कसोटी सामन्यातून बाहेरच ठेवले जाऊ शकते. टीम इंडियाच्या निवड समितीला दीर्घकाळ सातत्य ठेवून फलंदाजी करणारा खेळाडू रहाणेच्या जागी विराजमान करायचा आहे. सौरभ दादा यांनी रहाणे बद्दल बोलताना सांगितले की, रहाणे यांना अजून खूप धावा करायच्या आहेत त्यांना रणजीमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी करायची आहे. यावरून हे स्पष्ट होते की, अजिंक्य रहाणेला टीम इंडियात कायम राहण्यासाठी रणजी ट्रॉफीमध्ये विशेष अशी कामगिरी करावी लागणार आहे. आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात अजिंक्य राहण्याच्या जागी श्रेयस अय्यरला जागा दिली जाणार असल्याचे सूत्राद्वारे समजत आहे.

वृद्धिमान सहा

जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर मध्ये वृद्धिमान सहा यांचे देखील नाव समाविष्ट आहे. क्रिकेट विश्वातील एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून रिद्धिमान साहा यांची ओळख आहे. मात्र या बड्या खेळाडूला भारतीय क्रिकेट टीमच्या बाहेर जावे लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाने निवड समितीला सांगितले आहे की रिद्धिमान साहा त्यांच्या भविष्यातील योजनेत समाविष्ट नाही. यावरून रिद्धिमान साहा यांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट होत आहे, कारण की 37 वर्षीय वृद्धिमान साहा याला आगामी काही दिवस तरी टीम इंडियात स्थान मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे या खेळाडूकडे निवृत्ती धारण करणे हाच पर्याय उरतो. याचीही श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यात निवड होणार नाहीये.

ईशांत शर्मा

भारतीय क्रिकेट टीमचा एकेकाळी स्टार गोलंदाज म्हणून नावारूपाला आलेला त्याच्या कामगिरीने विरोधी संघ देखील त्याचे तोंड फोडून कौतुक करायचा तो म्हणजे इशांत शर्मा. ईशांत शर्मा या स्टार गोलंदाजाची आता भारतीय टीम मधून हकालपट्टी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकताच कसोटी मालिका संपन्न झाली त्यामध्ये भारतीय टीमचा स्टार गोलंदाज इशांत शर्मा यास संधी मिळालेली नव्हती.

यावरून हे स्पष्ट होत आहे की एकेकाळचा दिग्गज गोलंदाज आणि विरोधी संघाच्या फलंदाजांचा काळ म्हणून ओळखला जाणारा ईशांत शर्मा आता भारतीय टीम मध्ये अवघे काही दिवस राहणार असल्याचे समजत आहे, एकंदरीत या स्टार प्लेयर चे करियर आता संपुष्टिकडे जात आहे. बीसीसीआयच्या सूत्र द्वारे, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आणि मोहम्मद सिराज हे तिन्ही स्टार गोलंदाज आता निवड समितीची पहिली पसंत बनत आहेत. ईशांतने 100 कसोटी सामन्यात जवळपास  311 गडी बाद करून आपले गोलंदाजीचे करियर सुवर्ण अक्षरात क्रिकेट विश्वात कोरून ठेवले आहे. आगामी काही दिवसात ईशांतचे करियर संपुष्टात येणार एवढे नक्की, मात्र  या स्टार गोलंदाजाच्या सुवर्णमय कामगिरीला येणाऱ्या 100 पिढ्या लक्षात ठेवतील. 

English Summary: these indian cricketers are not play for indian side because Published on: 11 February 2022, 09:44 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters