1. इतर बातम्या

घ्या 'या' छोट्या गोष्टींची काळजी आणि जमीन खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला वाचवा

बरेच जण जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु बरेच जण म्हणतात की जो एवढ्या मोठ्या व्यवहार करेल तो प्रत्येक गोष्ट पाहूनच घेतो. ही तेवढेच खरे आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
take care of while you purchase farm land follow this tips

take care of while you purchase farm land follow this tips

 बरेच जण जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. परंतु बरेच जण म्हणतात की जो एवढ्या मोठ्या व्यवहार करेल तो प्रत्येक गोष्ट पाहूनच घेतो. ही तेवढेच खरे आहे.

परंतु बऱ्याचदा एखादी छोटीशी चूक संबंधित व्यवहारात फसवणुकीला आमंत्रण देऊ शकते. कधीकधी बरेच व्यवहार नुसते विश्वासावर होतात. परंतु अशा ठिकाणीच जास्त प्रमाणात फसवणूक होण्याची दाट शक्यता असते.

त्यामुळे तुम्हाला जर एखादे शेत जमीन खरेदी करायची असेल तर काही छोट्या परंतु उपयुक्त गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नुकसानीपासून आणि फसवणुकीपासून तुम्ही वाचाल. या लेखामध्ये आपण जमीन खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काटेकोर काळजी घ्यावी याची माहिती घेऊ.

 जमीन खरेदी करताना घ्या 'या' गोष्टींची काळजी

1- संबंधित जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा काटेकोरपणे पाहणे- आता आपल्याला माहित आहेस की आपण जी काही जमीन खरेदी करतो, प्रत्येक जमिनीचा सातबारा हा असतो व तो संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात आपल्याला प्राप्त होतो.

त्यामुळे संबंधित जमीन खरेदी करताना त्या जमिनीचा सातबारा संबंधित तलाठ्याकडून काढून घ्यावा व त्यावरील 8 अ उतारा आणि फेरफार व्यवस्थित पाहून घ्यावे. तुम्ही ज्या व्यक्ती कडून जमीन घेत आहात किंवा जी व्यक्ती जमीन विक्री करीत आहे, त्याचं नाव सातबार्यावर आहे का हे पाहणे खूपच गरजेचे आहे.

त्या सातबार्‍यावर एखाद्या मयत व्यक्ती किवा जुना मालकशिवाय इतर हक्कात इतर वारसांची नावे असल्यास ते काढून घेणे खूपच महत्त्वाचे असते.

तसंच एखाद्या बँकेचा किंवा कार्यकारी सोसायटीचा बोजा वगैरे तर नाही ना याची खात्री करावी. अर्थात  बोजा राहिला तर खरेदी होतच नाही हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित जमिनीवर एखादं कोर्टात प्रलंबित प्रकरण तर नाही ना हे तपासून पहाणे खूप गरजेचे आहे.

तसेच तुम्ही खरेदी करत असलेल्या जमिनीमधून एखादा नियोजित रस्ता किंवा महामार्ग तर येत नाही ना याची खात्री करावी व याची सातबारा उताऱ्यावर नोंद आहे की नाही याची खात्री करणे तेवढेच आवश्यक आहे. तुम्हाला जमिनीच्या इतिहासाचे सगळी माहिती तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षात मिळते.

जर तुम्ही संबंधित जमिनीचे फेरफार उतारे पाहिले तर सदर जमिनीचे मालकी हक्कात वेळोवेळी कोणकोणत्या प्रकारचे बदल होत गेले याची माहिती तुम्हाला अचूक मिळते.

नक्की वाचा:आनंदाची बातमी! 'मागेल त्याला शेततळे' योजनेत 50 हजार रुपये अनुदानात 50 टक्के वाढ

 2-भूधारणा पद्धत तपासून घेणे- खरेदी करत असलेली जमीन कोणत्या भूधारणा पद्धतीत येते हे पाहणे गरजेचे आहे. सातबारावर भोगवटादार वर्ग 1 असेल तर या प्रकारात अशा जमिनी येतात ज्यांचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात

 म्हणजे शेतकरीच या जमिनीचे मालक असतात. त्यामुळे असल्या जमिनीच्या व्यवहारात कुठली जास्त अडचण  येत नाही परंतु जमिनीवर जर भोगवटादार वर्ग 2 असे असेल तर त्या जमिनीचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे  निर्बंध असतात.

सरकारी अधिकाऱ्यांच्या परवानगी घेतल्याशिवाय या जमिनीचे हस्तांतरण होत नाही. या दोन्ही धारण प्रकार याशिवाय सरकारी पट्टेदार हा एक प्रकार येतो. या प्रकारामध्ये सरकारी मालकीच्या जमिनी असतात परंतु त्या भाडेतत्त्वावर दिलेल्या असतात.

3- जमिनीचा नकाशा पाहणे- तुम्ही शेत जमीन खरेदी करत असाल त्या जमिनीचा नकाशा पाहणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला तुम्ही घेत असलेल्या जमिनीची हद्द कळतय तसेच त्याच्या आजूबाजूला असलेली कोणते गटनंबर च्या जमिनी आहेत याची देखील माहिती स्पष्ट होते.

नक्की वाचा:उपयुक्त योजना!'या' घटकांना मिळते या योजनेअंतर्गत शेतजमीन,वाचा आणि जाणून घ्या या योजनेच्या पात्रता आणि अटी

4- शेताचा रस्ता- सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जी तुम्ही जमीन खरेदी करत आहात, हे पाहणे फारच गरजेचे असते. जर जमीन बिनशेती असेल तर जमीन पर्यंत रस्ता नकाशा मध्ये दाखवलेला असतो.

परंतु जमीन जर बिनशेती नसेल तर व रस्ता खाजगी असल्यास रस्त्यासाठी दाखवलेली जमीन व संबंधित मालक यांच्या हरकत नसल्याची खात्री करावी.

5- जमिनीचे खरेदीखत- तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करावे व यामध्ये गटनंबर, मूळ मालकाचे नाव, जमिनीची चतुसीमा,तसेच क्षेत्र बरोबर आहे की नाही हे तपासून घ्यावे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना दिलासा!'या' जिल्ह्यातील निधी बंद करण्यात आलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांना कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा

English Summary: take care of while you purchase farm land follow this tips Published on: 13 June 2022, 08:53 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters