1. इतर बातम्या

World Record: मराठमोळ्या ऋतुराजचा वर्ल्ड रेकॉर्ड ! एकाच षटकात ठोकले सात षटकार

World Record : आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला जमलं नाही, ते ऋतुराजनं (Ruturaj Gaikwad) जे करून दाखवलं आहे. महाराष्ट्राचा युवा फलंदाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे करंडक २०२२ मध्ये क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशच्या विरुद्ध खेळताना एकाच षटकात लागोपाठ सात षटकार ठोकून विश्वविक्रम रचला आहे.

World Record Ruturaj Gaikwad

World Record Ruturaj Gaikwad

आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला जमलं नाही, ते ऋतुराजनं (Ruturaj Gaikwad) जे करून दाखवलं आहे. महाराष्ट्राचा युवा फलंदाज सलामीवीर ऋतुराज गायकवाडनं विजय हजारे करंडक २०२२ मध्ये क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशच्या विरुद्ध खेळताना एकाच षटकात लागोपाठ सात षटकार ठोकून विश्वविक्रम रचला आहे.

आता एका षटकात सात षटकार हे कसं शक्य आहे, असा विचार करत असाल तर नेमकं त्या षटकात काय घडलं वाचा. विजय हजारे करंडक स्पर्धेत क्वार्टर फायनलची लढत महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात झाली. या सामन्यात खेळताना ऋतुराज गायकवाडनं विस्फोटक खेळी केली.

दिलासादायक! कांदा दरात मोठी वाढ; या बाजार समितीत मिळाला 3500 रुपये दर

ऋतुराजनं एकाच षटकात लागोपाठ सात षटकार ठोकले. एक षटकार त्यानं नो बॉलवर खेचला. या षटकात एकूण ४३ धावा चोपल्या. ऋतुराजनं या सामन्यात द्विशतक झळकावलं. सात षटकार ठोकण्याचा विक्रम त्यानं शिवा सिंह याच्या षटकात केला. या डावातील ४९ वं षटक होतं.

मोठी बातमी : भाजपला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ऋतुराज गायकवाड १५९ चेंडूंत १० चौकार आणि १६ चौकारांच्या मदतीने २२० धावा करून नाबाद राहिला. तर संघाच्या ५० षटकांत एकूण ३३० धावा झाल्या. आता गायकवाड यानं एका षटकात ७ षटकार खेचून इतिहास रचला आहे.

केंद्र सरकारने केले 8 मोठे बदल; आता जाणून घ्या, नाहीतर 13 व्या हप्त्यासाठी तुम्हाला 2,000 रुपये मिळणार नाहीत

English Summary: Marathmola Ruturaj World Record! Seven sixes in one over Published on: 28 November 2022, 04:32 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters