1. इतर बातम्या

काय म्हणता! भाड्याने घरात राहता तर घरभाड्यावर ही लागेल 18% जीएसटी, पण व्यवस्थित समजून घ्या यातील मुद्दे

मागे काही दिवसांअगोदर जीएसटी परिषद झाली व यामध्ये बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतर काही गोष्टींवर जीएसटी आकारण्यात आला. यामध्ये आता जीएसटीचा एक नवा नियम लागू केला असून त्यानुसार आता घरभाड्यावर देखील 18% जीएसटी भरावा लागणार आहे हा जो काही कर लागणार आहे तो 'रिव्हर्स चार्ज' व्यवस्थेअंतर्गत लागणार आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
18% gst on rented home

18% gst on rented home

 मागे काही दिवसांअगोदर जीएसटी परिषद झाली व यामध्ये बऱ्याच प्रकारचे खाद्यपदार्थ आणि इतर काही गोष्टींवर जीएसटी आकारण्यात आला. यामध्ये आता जीएसटीचा एक नवा नियम लागू केला असून त्यानुसार आता घरभाड्यावर देखील 18% जीएसटी भरावा लागणार आहे हा जो काही कर लागणार आहे तो 'रिव्हर्स चार्ज' व्यवस्थेअंतर्गत लागणार आहे.

 जर आपण यामधील  काही जाणकारांच्या मताचा विचार केला तर एखादी स्थावर मालमत्ता भाड्याने देणे यास जीएसटी अधिनियमानुसार सेवा मानण्यात आली आहे. त्यामुळेच यावर सेवाकर आकारण्याचा निर्णय हा घेण्यात आला आहे.

नक्की वाचा:दिलासादायक! खाद्यतेलाच्या किमतीत होऊ शकते इतक्या रुपयांनी घट; जाणून घ्या...

 ही गोष्ट काही मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट समजून घेऊ

1- कोणावर होईल परिणाम- रिअल इस्टेट तज्ञांच्या मते जर विचार केला तर जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेचा मुख्य उद्देश हा निवासी जागा भाड्याने देणाऱ्या संस्थांकडून कर वसूल करणे हा होता. परंतु या कायद्याचा जर मसुद्याचा आपण विचार केला तर घर भाड्याने घेणाऱ्या लोकांवर देखील या कराचा भार पडेल हे स्पष्ट आहे.

2- कोण येऊ शकते या कराच्या कक्षेत?- यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी जीएसटी नोंदणी केलेली आहे त्या लोकांवरच या कराचा भार पडणार आहे. त्यामुळे सगळ्याच नोकरदार किंवा व्यावसायिक भाडेकरू आहेत त्यांच्याकडून हा कर वसूल केला जाणार नाही.

नक्की वाचा:7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ; 'या' दिवसापासून लागू होणार

3- घरमालक नोंदणीकृत असणे गरजेचे-घर मालकाची जर जीएसटी नोंदणी केलेली नसेल, मात्र त्या घरामध्ये राहत असलेला भाडेकरूची जीएसटी नोंदणी असेल तर भाडेकरूकडून आठ टक्के दराने जीएसटी वसूल केला जाईल.

या अगोदरचा जो काही नियम होता त्यानुसार जर विचार केला तर व्यावसायिक वापरासाठीच घेतलेल्या घराच्या भाड्यावर जीएसटी लागत होता.

परंतु आता नवीन नियमानुसार तुम्ही घेतलेल्या भाड्याच्या घराचा वापर तुम्ही व्यवसायिक स्वरूपात करत असाल किंवा निवासी कारणाने  तरीसुद्धा तुम्हाला जीएसटी हा भरावाच लागणार आहे.

4- सर्वात महत्त्वाचे- आता आपल्याला माहिती आहे की बर्‍याच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घर भाड्याने घेतात.

मग यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की, यासाठी भरावा लागणारा जीएसटी नेमका कंपनीने भरावा की राहत असलेल्या कर्मचाऱ्याने, तरी यामध्ये स्पष्ट आहे की त्यामध्ये जीएसटी ही कंपनी भरेल कारण या मुद्द्यात कंपनी भाडेकरू आहे कर्मचारी नाही. कारण घर भाड्याने कंपनीने घेतले आहे कर्मचाऱ्याने नाही.

नक्की वाचा:Petrol Quality:गाडीत पेट्रोल भरण्याअगोदर वापरा 'हि'टिप्स, कळेल पेट्रोलचा दर्जा नाही होणार नुकसान

English Summary: if you stay in rented home can you fill 18 % gst Published on: 05 August 2022, 02:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters