1. बातम्या

महत्वाचे:शेणापासून तुम्ही कमवू शकता लाखो रुपये,जाणून घेऊ सविस्तर

पशु पालकांसाठी दशकांमध्ये अमर्यादित संधी असतात. पशुपालन व्यवसाय मध्ये महत्त्वाचे उत्पन्न हे फक्त दुधापासून मिळते. तसेच काही शेतकरी दुधापासून तूप आणि दही इत्यादी तयार करून घेऊ शकतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dung

dung

पशु पालकांसाठी दशकांमध्ये अमर्यादित संधी असतात. पशुपालन व्यवसाय मध्ये महत्त्वाचे उत्पन्न हे फक्त दुधापासून मिळते. तसेच काही शेतकरी दुधापासून तूप आणि दही इत्यादी तयार करून घेऊ शकतात.

परंतु त्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न हे कधी कमी तर कधी जास्त प्रमाणात असू शकते. पशुपालन व्यवसायामध्ये जनावरांपासून मिळणारे शेणहे बहुतांशी वाया जाते.शेणाचाउपयोग प्रामुख्याने शेतीसाठी खत म्हणून केला जातो. परंतु या शेनाचा  योग्य उपयोग केला तर त्यापासून चांगले उत्पादन मिळू शकते. या लेखात आपण शेनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती घेऊ.

 शेना पासून लाकूड निर्मिती

 शेना पासून लाकूड बनवणे बरोबरच इतर अनेक मार्गांनी गायीच्या शेनापासून पैसे कमवता येतात. यामध्ये वाळलेल्या शेणाचेदिवे, रोपांसाठी कुंड्या आणि बरेच काही समाविष्ट आहे.या वस्तूंची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.

परंतु या वस्तू बनवण्यासाठी ओल्या शेणाचे रूपांतर कोरड्या शेणात करावे लागते. या प्रक्रियेत भरपूर शेणाचे पाणी सोडले जाईल,जे शेतीसाठी खूप फायदेशीर ठरेल ते विकूनहीतुम्ही पैसे कमवू शकता.

 शेण कसे सुकवावे?

 आता शेण कसे सुकवावे आणि मग आलेल्या शेनापासून लाकूड कसे तयार करायचे हा प्रश्न आहे.या दोन्ही कामांसाठी मशीन ची गरज आहे.या कामांसाठीयंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्राच्या मदतीने ओल्या शेणाचे रूपांतर कोरड्या शेणात करू शकता.

त्यानंतर दुसरे मशीन येथे जे कोरड्या शेणापासून लाकूड बनवण्यासाठी वापरले जाते.

 पंजाबच्या पटियाला येथील सनीने काही वर्षांपूर्वी एका समशन पंजाबच्या पटियाला येथील सनीने काही वर्षांपूर्वी एक असे यंत्र  बनवले होते जे शेणाचे लाकूड बनवू शकते. बऱ्याच लोकांनी हे यंत्र विकत घेतले आहे. त्यानंतर सनीने असे मशीन बनवले जे एका तासात एक टन सुके शेण तयार करू शकते.हा व्यवसाय तुम्ही दोन यंत्राच्या साह्याने सुरू करू शकतो.

English Summary: you can earn more money from making some articles from cow dung Published on: 15 December 2021, 09:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters