1. बातम्या

Onion Market Rate: बातमी दिलासादायक! आज 'या' बाजार समिती लाल कांद्याला मिळाला 4000 रुपये प्रतिक्विंटल दर, वाचा आजचे निवडक बाजार समितीतील भाव

सध्या कांद्याचे बाजारभाव मध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसून येत आहे. अजून देखील नवीन कांद्याची म्हणजेच लाल कांद्याचे आवक पुरेशी होत नसून तसेच शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला जुना कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाल्यामुळे कांद्याचे आवक मागणीच्या मानाने अत्यल्प प्रमाणात होत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
red onion market rate update

red onion market rate update

सध्या कांद्याचे बाजारभाव मध्ये हळूहळू सुधारणा होताना दिसून येत आहे. अजून देखील नवीन कांद्याची म्हणजेच लाल कांद्याचे आवक पुरेशी होत नसून  तसेच शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेला जुना कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाल्यामुळे कांद्याचे आवक मागणीच्या मानाने अत्यल्प प्रमाणात होत आहे.

यामुळेच कांद्याच्या दरात हळूहळू का होईना सुधारणा होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर  महाराष्ट्रातील काही निवडकबाजार समितीतील लाल कांद्याचे दर किती होते? त्याबद्दल या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Onion Price: कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या कुठे किती मिळतोय दर...

 महाराष्ट्रातील निवडक बाजार समितीतील लाल कांद्याचे दर

1- सोलापूर बाजार समिती- सोलापूर बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 17 हजार 322 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. भावाचे सरासरी 1800 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

2- जळगाव बाजार समिती- जळगाव बाजार समितीमध्ये आज 624 क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन झालेल्या लिलावात कमीत कमी 452 रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त एक हजार 877 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाचे सरासरी 1250 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

नक्की वाचा:Corn Market Update: मक्याला मिळत आहे हमीभावापेक्षा कमी दर, भविष्यात कसा राहू शकतो मक्याचा बाजारभाव? वाचा डिटेल्स

3- भुसावळ बाजार समिती- भुसावळ बाजार समितीमध्ये आज 49 क्विंटल लाल कांद्याची आवक होऊन 1500 रुपये कमीत कमी तर जास्तीत जास्त 1500 व भावाचे सरासरी देखील 1500 इतकीच राहिली.

4- संगमनेर बाजार समिती- संगमनेर बाजार समितीमध्ये आज 34 क्विंटल लाल कांद्याचे आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी दोन हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाचे सरासरी 2750 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.

5- पाथर्डी बाजार समिती- पाथर्डी बाजार समितीमध्ये आज लाल कांद्याची 500 क्विंटल इतकी आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी पाचशे रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त 3500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाची सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल इतके राहीली.

नक्की वाचा:Market Update: कोथिंबीर कडाडली! 'या' ठिकाणी कोथिंबीरची एका जुडीची भरारी 100 रुपयांवर, वाचा डिटेल्स

English Summary: today get 4000 rupees per quintal rate to red onion in solapur market commitee Published on: 29 October 2022, 07:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters