सध्या परतीच्या पावसामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. असे असताना आता बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथील शेतकरी यशवंत मेटकरी यांच्या शेतातील सुमारे चार लाख रुपयांच्या डाळिंबाची चोरी झाली आहे.
यामुळे येथील शेतकरी चिंतेत आहेत. यशवंत मेटकरी यांच्या शेतातील तीन टन डाळिंब अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या फळाला चांगला दर्जा देखील होता. व्यापाऱ्यांनी मेटकरी यांच्या डाळिंब बागेत भेट देत विक्रीसाठी बोली लावली होती.
तसेच व्यापाऱ्याने १४८ रुपये प्रति किलोने हा माल ठरवला होता. मात्र, रात्रीच्या वेळी चोरट्यांनी ५०० झाडावरील डाळिंब रातोरात लंपास केली. यातून अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
'साखर कारखाना हे मंदिर आणि शेतकरी हे देव'
सध्या डाळिंब बागेतील होत असणारी वाढती चोरी यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे शेतकरी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी करत आहेत.
सितरंग चक्रीवादळ आज धडकणार, 7 राज्यांना फटका बसणार
सध्या डाळींबाला चांगला दर असल्याने अशा घटना वाढत आहेत. यामुळे याला वेळीच आळा बसने गरजेचे आहे. याबाबत सामुदायिक प्रयत्नातून आपल्या डाळिंब बागेचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे कष्ट पूर्णपणे वाया जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
'पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील'
सहकारी संस्था असावी तर अशी! शेतकऱ्यांना दिलाय लाखोंचा बोनस...
नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत केली 'दिवाळी' साजरी
Share your comments