राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे कृषीमंत्री म्हणतात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हे डोंगराएवढेच असतात.
अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी त्यांना चांगलंच सुनावलं आहे. राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागाची पाहणी केली. यावेळी अस्मानी व सुल्तानी संकटामुळे शेतकऱ्यांना 1 रूपया म्हणजे गाडीच्या चाकासारखा वाटू लागला आहे. याची किंमत 50 खोकेवाल्यांना कधी समजणार? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, त्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो. मात्र हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील असा टोला राजू शेट्टी यांनी अब्दुल सत्तार यांना लगावला आहे. त्यानंतरही तुम्ही शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणार नसाल तर या शेतकऱ्यांच्या डोक्यात आग भडकल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
'गोलू' चा पॅटर्नच वेगळाय! खाद्य आणि किंमत वाचून येईल चक्कर..
त्यामध्ये कोणकोण भस्म होईल हेही सांगता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे.
'साखर कारखाना हे मंदिर आणि शेतकरी हे देव'
यामुळे विरोधकांकडून त्यांच्याकर टीका केली जात आहे. सध्या दिवाळीचा सण साजरा केला जात असताना मात्र शेतकऱ्यांना दिवाळी गोड लागत नाही. शेतकऱ्यांचे या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
सहकारी संस्था असावी तर अशी! शेतकऱ्यांना दिलाय लाखोंचा बोनस...
नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत केली 'दिवाळी' साजरी
सितरंग चक्रीवादळ आज धडकणार, 7 राज्यांना फटका बसणार
Share your comments