1. बातम्या

भाटघर धरणाने तळ गाठला, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

अजूनही पावसाळा सुरुवात झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी शेतातील कामांची लगबग सुरु असून केवळ पावसाअभावी आता कामे रखडली आहेत. असे असताना आता पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर (Bhatghar) धरण क्षेत्रात अजूनही पाऊस झालेला नाही. या धरणावर अनेक शेतकऱ्यांचे पीक अवलंबून आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Bhatghar dam water  reached the bottom

Bhatghar dam water reached the bottom

सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. असे असताना अजूनही पावसाळा सुरुवात झाली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांनी शेतातील कामांची लगबग सुरु असून केवळ पावसाअभावी आता कामे रखडली आहेत. असे असताना आता पुण्यातील (Pune) भोर (Bhor) तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर (Bhatghar) धरण क्षेत्रात अजूनही पाऊस झालेला नाही. या धरणावर अनेक शेतकऱ्यांचे पीक अवलंबून आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्याने कमी होऊ लागली आहे. धरणातील पाणी साठ्यानं तळ गाठला आहे. सध्या धरणात केवळ 8 टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. यामुळे जर अजून काही दिवस पाऊस नाही पडला तर अडचणी निर्माण होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष लागले आहे. या धरणावर अनेक शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे.

यामध्ये भोर, खंडाळा, बारामती, इंदापूर, फलटण, सोलापूर तालुक्यातील शेतीला आणि गावांना धरणातून पाणी पुरवठा होतो. यावर्षी पाण्याची कमतरता भासली नाही, मात्र आता पाऊस पडला नाही तर येणाऱ्या काळात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. या भागातील शेतीला धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्याने, धरणातील पाणीसाठा कमी झाला. पावसाच्या गणितावर गाणी सोडण्यात आले.

शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायाकडे वळा, 'ही' ३५ कारणे तुम्हाला मिळवून देतील लाखो रुपये..

पाऊस देखील दमदार होईल, असे सांगितले गेले. असे असताना पाऊस गायब झाला आहे. मान्सून वेळेच्या आगोदर दाखल होईल असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला होता. परंतु जून महिना अर्धा संपत आलातरी समाधानकारक असा पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. यंदा कडक उन्हाळा असल्यामुळे धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता. धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्याने मेथीवर फिरवला रोटर, शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट
एक आमदार असाही! पाण्यासाठी मंत्रीपद नाकारले, पण लोकांना पाणी दिलेच..
पुढील ऊस गाळप हंगामात मोठे बदल, अतिरिक्त उसामुळे सरकारचा निर्णय

English Summary: The Bhatghar dam reached the bottom and the farmers were worried due to heavy rains Published on: 18 June 2022, 10:19 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters