1. बातम्या

अमेरिकन संशोधकांनी केली कमाल! चंद्राच्या मातीवर प्रथमच उगवले रोपटे त्यामुळे होऊ शकतो का चंद्रावरील शेती करण्याचा मार्ग मोकळा?

चंद्रावर सध्या मानवी वस्ती उभी करण्यासाठी जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत असून या बाबतीत एक महत्त्वपूर्ण यश संशोधकांना मिळाले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
image courtesy engadget

image courtesy engadget

 चंद्रावर सध्या मानवी वस्ती उभी करण्यासाठी जागतिक स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत असून या बाबतीत एक महत्त्वपूर्ण यश संशोधकांना मिळाले आहे.

 अमेरिका येथील फ्लोरिडा विद्यापीठाच्या संशोधकांनी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून चंद्र मातीवर रोपटे उगवण्याचा एक ऐतिहासिक पराक्रम करून दाखवला आहे. ही माती नासाच्या अंतराळ पटूनी काही वर्षांपूर्वी अपोलो या मोहिमेच्या माध्यमातून पृथ्वीवर आणली होती. याबाबतीतले संशोधन कम्युनिकेशन बायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले असून  या संशोधनात वैज्ञानिकांनी सांगितले आहे की केवळ पृथ्वीच नाहीतर अंतराळातून आलेल्या माती वर ही वनस्पती उगवू शकते हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे. करण्यात आलेल्या या अभ्यासात संशोधकांनी चंद्राच्या मातीवरील वनस्पतींच्या जैविक प्रतिसादाचे निरीक्षण केले. या सगळ्या संशोधनातून चंद्रावर अन्न व ऑक्सिजन साठी शेती करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे.

 संशोधकांनी रोपटे या पद्धतीने उगवले

 अमेरिकास्थित फ्लोरीडा विद्यापीठाच्या प्राध्यापिका एना लिसा पॉल यांनी सांगितले की या प्रयोगाच्या अगोदर देखील चंद्राच्या मातीवर वनस्पती उगवण्याचा  प्रयत्न करण्यात आला पण तेव्हा चंद्राची मातीची शिंपडण्यात आली होती. परंतु या नव्या संशोधनात चंद्राच्या मातीतच रोप उगवण्यात आले आहे. यामध्ये संशोधकांनी चार प्लेटचा वापर केला. त्यात पाण्यासह चंद्रमातीवर न आढळणारे न्यूट्रियंट्स मिसळण्यात आले व त्यानंतर या द्रव्यात ओर्बीडोपसीसचे बियाणे पेरण्यात आले. त्यानंतर काही दिवसातच या मातीतून जानकर उगवले. फ्लोरिडा विद्यापीठातील प्रोफेसर रॉबर्ट पेरी यांच्या माहितीनुसार, 11 वर्षात तीन वेळा अर्ज केल्यानंतर नासाने त्यांना 12 ग्रॅम माती दिली.

एवढ्याशा मातीवर प्रयोग करणे अशक्य होते पण अखेरीस त्यांना रोपे उगवण्यात यश आले. ही माती अपोलो 11, 12 व 17 मोहिमेद्वारे गोळा करण्यात आली होती. (स्त्रोत-दिव्यमराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:सावधान! 'या' लोकांनी चुकूनही टोमॅटो खाऊ नये; नाहीतर आरोग्यावर होतील 'हे' घातक परिणाम

नक्की वाचा:भावा फक्त तुझीच हवा!! मुंबईचा उद्योजक गावी परतला अन शेती सुरु केली; आज कमवतोय वर्षाकाठी 20 लाख

नक्की वाचा:Goat Rearing: शेळी पालन व्यवसाय करायचा आहे तर 'या' बँक देतील लोन, जाणून घ्या शेळीपालन लोन विषयी सविस्तर माहिती

English Summary: the american scientist to research about cultivate plant on moon soil Published on: 13 May 2022, 10:42 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters