1. बातम्या

कणेरी कृषी विज्ञान केंद्रात माती सुपोषण व संवर्धन अभियान संपन्न

शेतकरी कुटुंबांनी या मातीचे व कलशाचे पूजन केले व इतर उपस्थित शेतकऱ्यांसमोर मातीचा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मंत्र अर्थासहित शेतकऱ्यांना सांगण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी माती व कलश्यावर फुले व अक्षदा वाहून जलाभिषेक केला. यासोबत ज्या गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. त्या सर्व गावांनी पाडव्याच्या शुभ दिवशी मातीचे सुपोषण व संवर्धन करण्यासाठी संकल्प व प्रतिज्ञा घेतली.

Kaneri Agricultural Science Center News

Kaneri Agricultural Science Center News

कोल्हापूर : श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी व श्री सिद्धगिरी मठ महासंस्थान यांनी आयोजित केलेल्या माती सुपोषण व संवर्धन कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी चेअरमन श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी यांनी आव्हान केल्यानुसार कोल्हापूर जिल्हातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.

जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओंजळभर माती आणून गावातील सार्वजनिक ठिकाणी किंवा मंदिराच्या ठिकाणी गोळा केली. त्या मातीची एका पांढऱ्याशुभ्र कापडावरती किंवा काही ठिकाणी शेणाचा सडा दिलेल्या जागेवरती रास करण्यात आली. त्यावरती एक कलश ठेवण्यात आला. मातीची रास व कलश पानांनी, फुलांनी व रांगोळीने सजवण्यात आले.

शेतकरी कुटुंबांनी या मातीचे व कलशाचे पूजन केले व इतर उपस्थित शेतकऱ्यांसमोर मातीचा संरक्षण व संवर्धन करण्यासाठी मंत्र अर्थासहित शेतकऱ्यांना सांगण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी माती व कलश्यावर फुले व अक्षदा वाहून जलाभिषेक केला. यासोबत ज्या गावांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यात आले. त्या सर्व गावांनी पाडव्याच्या शुभ दिवशी मातीचे सुपोषण व संवर्धन करण्यासाठी संकल्प व प्रतिज्ञा घेतली.

शेतकऱ्यांनी मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करू, नैसर्गिक शेती करण्यासठी प्रयत्न करू, रासायनिक खताचा व कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करणार, जास्तीत जास्त झाडांची लागवड करणे, प्लास्टिक, थर्मोकोल इत्यादी मातीचे प्रदूषणकरणाऱ्या पर्यायांचा कमीत कमी वापर करणे, देशी गोपालनास चालना देणे, कागद व झाडापासून बनणाऱ्या इतर वस्तू जेव्हा अत्यावश्यक असतील तेव्हाच वापर करून व या वस्तूंच्या पुनर्वापर करण्याबाबत सावधगिरी बाळगने, या सर्व पर्यायांच्या अंमलबजावणीसाठी मी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करेन, ज्यात माझ्या राष्ट्र आणि पृथ्वी मातेचे हित समाविष्ट आहे इत्यादी सारख्या व जमिनीच्या आरोग्य चांगलं राखण्यासाठी जे जे पर्याय अवलंब करावे लागतील ते सर्व पर्याय अवलंब करण्याची प्रतिज्ञा सर्व उपस्थिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावरती राशीत जमा केलेली माती सर्व उपस्थित शेतकर्यांना थोडी थोडी घेऊन आपल्या शेतामध्ये टाकण्यासाठी देण्यात आले. अशा प्रकारे कोल्हापूर जिल्हात पाडव्याच्या शुभ दिवशी २५० अधिक गावामध्ये माती सुपोषण व संवर्धन अभियानातर्गत कार्यक्रम घेण्यांत आले.

English Summary: Soil nutrition and conservation campaign completed at Kaneri Agricultural Science Center Published on: 13 April 2024, 01:39 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters