1. बातम्या

कृषि विज्ञान केंद्र, अकोला द्वारे ग्राम हिंगणी येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांचे द्वारे ग्राम हिंगणी

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
कृषि विज्ञान केंद्र, अकोला द्वारे ग्राम हिंगणी येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

कृषि विज्ञान केंद्र, अकोला द्वारे ग्राम हिंगणी येथे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांचे द्वारे ग्राम हिंगणी तालुका तेल्हारा येथे दिनांक 18 ऑगस्ट 2022 ला केळी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी केळी पिकामध्ये घड व्यवस्थापन या विषयी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान श्री गजानन तुपकर, विषय

विशेषज्ञ(उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र, अकोला यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना एकात्मिक अनद्रव्य व्यवस्थापन तसेच घड व्यवस्थापन करत असताना 8 ते 9 घड ठेवून बाकी फण्यांची विरळनी करणे, लाल फुलकिडे व्यवस्थापन साठी निम तेल Neem oil for red leafhopper managementआणि

इमिडाक्लोप्रिड ची केळ फुल कापल्या नंतर फवारणी, केळ फुल वेळीच कापणी चे महत्व, घडांवर बनाना शक्ती आणि बनाना स्पेशल पीक निहाय विद्राव्य खत फवारणी, गुणवत्ता युक्त घड निर्मिती साठी घड स्कर्तिंग बॅग झाकणे इत्यादी अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी उपस्थित

केलेल्या विविध प्रश्नांवर श्री गजानन तुपकर यांनी मार्गदर्शन केले.प्रशिक्षण नंतर केळी बागेत भेट देऊन तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री सुनील नराजे, श्री यश नराजे आणि सोपान नराजे यांनी परिश्रम घेतले.

English Summary: Organized training for banana farmers at Village Hingani by Krishi Vigyan Kendra, Akola Published on: 18 August 2022, 08:41 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters