1. बातम्या

Onion Rate Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! कांद्याच्या बाजारभावात होत आहे सुधारणा, 'ही' आहेत त्यामागची कारणे

शेतकरी बंधूंच्या डोळ्यात कायम पाणी आणणारा कांद्याने यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणण्याचे काम केले. यावर्षी कांदा अगदी कवडीमोल दराने विकला गेला. त्यामुळे शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर निसर्गामुळे अनेक ठिकाणी रब्बी कांद्याची फार मोठे नुकसान झाले होते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion rate update

onion rate update

शेतकरी बंधूंच्या डोळ्यात कायम पाणी आणणारा कांद्याने यावर्षी देखील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणीच आणण्याचे काम केले. यावर्षी कांदा अगदी कवडीमोल दराने विकला गेला. त्यामुळे शेतकरी बंधूंचा उत्पादन खर्च देखील निघाला नाही. महाराष्ट्र मध्ये बऱ्याच ठिकाणी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.  परंतु जर आपण मागच्या वर्षीचा विचार केला तर निसर्गामुळे अनेक ठिकाणी रब्बी कांद्याची फार मोठे नुकसान झाले होते.

नक्की वाचा:Farmer suicide: मुसळधार पावसाने सोयाबीन पिकाचे नुकसान! परभणीत 24 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदा बाजार भाव नसल्यामुळे येणार्‍या भविष्यकाळात कांद्याला चांगला बाजार भाव मिळावा म्हणून कांदा साठवून ठेवला होता.  परंतु बाजारभावात वाढ झाली नाही परंतु साठवलेला कांदा खराब होऊ लागला व त्याच्या वजनात देखील घट आली.

तसेच ज्या शेतकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा विकला त्यांना अतिशय कवडीमोल भाव मिळाला. म्हणजे एकंदरीत  परिस्थिती पाहिली तर कांदा उत्पादक शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडले होते. प

रंतु मागील काही दिवसांपासून विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल असे चित्र तरी सध्या आहे.

जर आपण नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर उन्हाळी कांद्याला सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. आता जी काही कांद्याच्या भावात सुधारणा होत आहे त्यामागे बरीच कारणे आहेत.

नक्की वाचा:झुम शेतीमधून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; जाणून घ्या 'या' पद्धतीविषयी

 कांद्याचा दरवाढ होण्यामागील कारणे

 सध्या चाळीत शेतकर्‍यांनी साठवून ठेवलेला कांदा देखील खराब झाला असून बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक कमी झालेली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठायांचे संतुलन विस्कळीत झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होताना दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कांद्याची आवक होत असून बाकीच्या राज्यात अजून देखील कांद्याची आवक हवी तेवढी पाहायला मिळत नाही. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे जर आपण नवीन लाल कांद्याचा विचार केला तर दसऱ्यापासून नवीन लाल कांदा बाजारपेठेत विक्रीसाठी यायला लागतो.

रंतु यावर्षी दिवाळी तोंडावर आली तरी देखील नवीन लाल कांद्याची आवक बाजारपेठेत नाही. त्यामुळे ही जी काही कांद्याच्या बाजारभावात वाढ होत आहे ती आणखी काही दिवस राहील असा एक अंदाज आहे.तसेच जर या क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीचा विचार केला तर त्यांच्या मते नवीन खरीप लाल कांद्याचे पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने बाजारात लाल कांद्याची आवक अतिशय नगण्य आहे.

नवीन कांद्याची आवक होत आहे ती मागणीच्या मानाने पुरेसे नाही. तसेच चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रत घसरल्यामुळे आवक कमी होत आहे.तसेच भारतातील जे काही बाकीचे कांदा उत्पादक राज्य आहेत,

त्या ठिकाणी देखील झालेल्या पावसामुळे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे नवीन लाल कांदा लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाला असून उत्पादनात घट आली आहे. काही ठिकाणी लाल कांदा चांगला आहे परंतु उशिरा लागवड केल्यामुळे तो अजून बाजारात यायला वेळ आहे. इत्यादी कारणांमुळे नवीन लाल कांद्याची आवक बाजारात कमी असून सध्या  उन्हाळी कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहे.

नक्की वाचा:एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्या, ऊस दरासाठी राजू शेट्टींचा एल्गार

English Summary: onion rate improve frome some days because some condition caused for that Published on: 16 October 2022, 02:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters