1. बातम्या

उलटे चक्र! कांद्याचे वाढताहेत भाव, परंतु शेतकर्यांिच्या डोळ्यात पाणी

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी होत आहे.नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, बागलान, चांदवड इत्यादी तालुक्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
onion

onion

 मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये अतिवृष्टी होत आहे.नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव, बागलान, चांदवड इत्यादी तालुक्यांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस झाल्याने कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले.

साठवलेला कांदाओलाव्यामुळे सडत आहे.त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्यात आहे कांदा आवककमालीची घटल्यानेनाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्याने कांद्याला कमाल तीन हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.काल दिनांक एक शुक्रवार च्या तुलनेत सरासरी कांदा दरातपाचशे रुपयांची वाढ झाली आहे.

कांदा आवक कमालीची मंदावली

गेल्या तीन-चार दिवसांपासून लासलगाव व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याने शेतात पाणी साचले आहे.

त्यामुळे बाजारपेठेत कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात मंदावले आहे. सणासुदीच्या काळ बघता कांद्याच्या भावात वाढ होऊ शकते अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. पश्चिम बंगाल, दिल्लीच्या बाजारपेठांमध्ये दक्षिण भारतातून आलेला कांदा पावसामुळे सडल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

 त्यातच पावसामुळे राजस्थान सह दक्षिणेकडील भागात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नाशिकच्या उन्हाळी कांद्याला देशांतर्गत मागणी वाढली आहे. परिणामी पाच दिवसात कांद्याच्या भावाने प्रति क्विंटल  अकराशे रुपयांनी उसळी घेतली.

पडणार्‍या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज जरी कांद्याला भाव मिळत असला असे दिसत असले तरी वजन आणि प्रतवारी मध्ये कांद्याला मोठा फटका बसला आहे.त्यामुळे भाव जरी मिळत असला तरीशेतकऱ्यांकडे दर्जेदार कांदा उपलब्ध नाही.

 

English Summary: onion rate growth but no benifit to farmer due to heavy rain Published on: 02 October 2021, 07:12 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters