1. बातम्या

IPL मध्ये झळकणार नाशिकचा सुपुत! आयपीएलच्या लिलावात नासिकचा रणजी प्लेयर सत्यजित बच्छाव

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग ही t-20 क्रिकेटमधील जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आगामी काही दिवसात आयपीएलचा बिगुल वाजणार असून यासाठी तयारी जोरात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलच्या लिलावात कोणकोणते प्लेयर असणार आहेत याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे आगामी आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावात नाशिकचे सुपुत व प्रसिद्ध रणजीपटू सत्यजित बच्छाव यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सत्यजित ची आयपीएल मध्ये एन्ट्री होणार असल्याची आशा त्यांना आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
फोटो सौजन्य-पैसावापस

फोटो सौजन्य-पैसावापस

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग ही t-20 क्रिकेटमधील जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. आगामी काही दिवसात आयपीएलचा बिगुल वाजणार असून यासाठी तयारी जोरात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलच्या लिलावात कोणकोणते प्लेयर असणार आहेत याची माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिककरांसाठी एक आनंदाची बातमी आहे आगामी आयपीएलसाठी होणाऱ्या लिलावात नाशिकचे सुपुत व प्रसिद्ध रणजीपटू सत्यजित बच्छाव यांची निवड करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सत्यजित ची आयपीएल मध्ये एन्ट्री होणार असल्याची आशा त्यांना आहे.

आयपीएल 2022 साठी आगामी काही दिवसात म्हणजेच 12 व 13 फेब्रुवारीला बेंगलोर मध्ये महा लिलाव पार पडणार आहे. याच महा लिलावासाठी नाशिकच्या सत्यजित बच्छावची निवड झाली आहे. या होऊ घातलेल्या IPL लिलावात जगभरातील 590 क्रिकेटपटूंवर बोली लागणार आहे. यामध्ये 370 भारतीय खेळाडू आहेत तर 220 खेळाडू भारताच्या सहयोगी देशातील आहेत. या लिलावात 2022 मध्ये सहभागी होणारे दहा संघ आप-आपल्या खेळाडूंना बोली लावणार आहेत. नुकत्याच या दहा संघांनी एकूण 1214 खेळाडूंपैकी या 590 खेळाडूंना पसंती दर्शवली आणि त्यात नाशिकच्या सत्यजितला देखील स्थान मिळाले आहे. ही बाब नाशिककरांसाठी तसेच पश्‍चिम महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाची असल्याचे सांगितले जात आहे. सत्यजित यांनी रणजीमध्ये मोठी चांगली कामगिरी केली आहे मागील दोन-तीन हंगामात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे रणजीतला तो एक स्टार गोलंदाज म्हणून उदयास आला आहे.

नुकत्याच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मुस्ताक अली t-20 स्पर्धेत त्याने मोलाची कामगिरी करत अवघ्या सहा सामन्यात सात बळी घेतले आहेत. या स्पर्धेत गोव्या विरुद्ध तीन तर पुदुचेरी विरुद्ध दोन असे बळी घेतले आहेत. आपल्या या कामगिरीमुळे त्याने महाराष्ट्र संघाला विजयाची पताका मिळवून दिली आहे. सत्यजितने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत महाराष्ट्राकडून 23 सामने खेळले असून या सामन्यात त्याने 78 गडी बाद केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने एका सामन्यात पाच गडी बाद केले आहेत, तर दोन सामन्यात त्याने चार गडी पवेलियन मध्ये परतावली आहेत. डावखुऱ्या हाताचा हा नाशिकचा नाशिक रत्न सत्यजित आपल्या कामगिरीमुळे रणजीत एक मोठा स्टार प्लेयर म्हणून उदयास आला असून, जर त्याने अशीच कामगिरी केली तर तो भविष्यात भारतीय संध्या कडून खेळण्याची आशा आहे.

सत्यजित तसं बघता गोलंदाजीच्या भूमिकेत आपल्या संघासाठी महत्वाची कामगिरी बजावत असतो मात्र असे असले तरी, सत्यजित हा एखाद्या माहिर फलंदाजांसारखी फलंदाजी देखील करण्यास सक्षम आहेत. त्यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या यशस्वी करिअर मध्ये तीन अर्धशतके झळकावली आहेत यामध्ये 67 धावांची खेळी हि त्याची उत्तम खेळी आहे. त्याची ही कामगिरी बघता नाशिकचे तसेच पश्‍चिम महाराष्ट्राचे क्रिकेटप्रेमी त्याला हार्दिक सदिच्छा देत त्याची आयपीएल मध्ये निवड होईल अशी आशा करीत आहे. 'नासिक रत्न' सत्यजितसाठी नाशिक सह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आयपीएल महा लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहे.

English Summary: Nashik's Suput to shine in IPL! Satyajit Bachchan, a Ranji player from Nashik in the IPL auction Published on: 03 February 2022, 10:38 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters