1. बातम्या

माझे मत ! कृषी क्षेत्रातील आधुनिक भोंदू बाबा आणि त्यांच्या आधुनिक अंधश्रद्धा..

कृषी क्षेत्रात अगदी पहिल्या पासूनच माहिती विस्ताराची (Extension) वाणवा आहे आणि त्याचा फायदा घेऊन तथाकथित कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांचे पीक जोमात आले आहे. याउलट काही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांच्या मुळेच चांगली शेती होत आहे त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
माझे मत

माझे मत

कृषी क्षेत्रात अगदी पहिल्या पासूनच माहिती विस्ताराची (Extension) वाणवा आहे आणि त्याचा फायदा घेऊन तथाकथित कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांचे पीक जोमात आले आहे. याउलट काही प्रामाणिक व कर्तव्यदक्ष कृषी अभ्यासक आणि सल्लागार यांच्या मुळेच चांगली शेती होत आहे त्यांचे योगदान खूप महत्वाचे आहे.

असे खरोखर काम करणारे लोक सोडून जे चुकीचे काम करत आहेत त्यांचा मी उल्लेख मी मुद्दाम करतोय. मी अशा अर्धवट शिकलेले आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांना काहीच्या काही सल्ला झाडणारे, शेतकरी मित्रांचा खर्च भरमसाठ वाढविणारे यांना आता शेती क्षेत्रामधील आधुनिक भोंदू बाबाचं म्हणण योग्य ठरणार आहे. यांच्या प्रतापामुळे अनेक आधुनिक अंधश्रद्धा निर्माण झाल्या आहेत आणि त्या एवढ्या घट्ट झाल्या आहेत की ही हे चुकीचे आहे, असे सांगणाऱ्या वेड्यात काढले जाते.

अशा या महाभाही लोकांविषयी आणि आधुनिक अंधश्रद्धा यावर आता खुलेपणाने बोलले गेले पाहिजे. माय बाप शेतकऱ्यांना याविषयी खरे मार्गदर्शन झाले पाहिजे. यात मी एक सुरुवात करतोय. काही आधुनिक अंधश्रद्धा यांचा उल्लेख करणार आहे आणि त्याचे खरे रूप मांडणार आहे...
भोंदू बाबांच्या मते काही शेती मधील आधुनिक अंधश्रद्धा अशा आहेत.

१. Phospheric एसिड वापरून Phosphorus या अन्नद्रव्याची पूर्तता करून पीक भरघोस येते.
२. झिरो बजेट नैसर्गिक शेती.
३. जेवढे जास्त महाग औषध, खत तेवढे त्याचे फायदे जास्त..
४. फक्त विद्राव्य खते वापरून आपण जमनीचे आणि पिकाचे पूर्ण पोषण करू शकतो आणि त्यातून भरपूर उत्पन्न मिळते.

अशा खूप गोष्टी आहेत त्या शेती मध्ये खूप घोळ करत आहेत त्यामुळे उत्पन्न खर्च वाढत आहे आणि शेती तोट्यात जात आहे.
Phospheric एसिड मुळे आपल्या शेतीमध्ये तात्पुरता सामू कमी करण्याखेरीज कोणताही फायदा होत नाही. बाजारात १७०० रू पासून ५००० रू पर्यंत २० ली. Phospheric एसिडचे कॅन मिळतात. हे कोणत्या Fertilizer Act मध्ये येत नाही. यापैकी कोणते खरे समजावे आणि कोणते खोटे .

आपण शेतकरी म्हणून यासाठी एक प्रयोग करू शकता. आपण ज्या वेळी Phospheric एसिड शेतामध्ये देणार असाल त्यावेळी एक ओळ बंद करून ठेवा म्हणजे त्या ओळीला फोस्फरिक एसिड द्यायचे नाही. असे वर्ष भर चालू ठेवा. बाकी सर्व तुमच्या पद्धतीने करा. ज्यावेळी पीक काढले जाईल त्या वेळी त्या ओळीचे निरीक्षण करावे आणि काय फरक पडतोय ते पाहावे?

 

आपल्याला कोणती गोष्ट चुकीची वाटत आहे ती आपण ही मांडावी, तरच इतर शेतकऱ्यांना समजेल.   जोपर्यंत आपण आपल्या शेतावरील सर्व कामांची, औषधे, खते यांच्या वेळोवेळी नोंदी ठेवत नाही आणि त्याचा अभ्यास करत नाही तो पर्यंत हे भोंदू बाबा आपल्या फसवत राहणार आणि आपल्या अंधश्रद्धा वाढत राहणार.

लेखक - सचिन देशमुख सातारा
प्रतिनिधि गोपाल उगले

English Summary: Modern fake fathers in the field of agriculture and their modern superstitions Published on: 20 August 2021, 10:58 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters