1. बातम्या

एक पाऊल पुढे! मेरा फॅमिली फार्मर नावाचे स्टार्टअप देईल शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बाजार भावापेक्षा जास्त भाव

शेती क्षेत्रामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, त्याचा वापर तसेच कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे स्टार्टअप देखील उदयास येत आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
mera family farmer  startup give more rate to vegetable

mera family farmer startup give more rate to vegetable

शेती क्षेत्रामध्ये नेहमी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, त्याचा वापर तसेच कृषी क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे स्टार्टअप देखील उदयास येत आहेत.

अशा स्टार्टअपना राज्य व केंद्र सरकारकडून आर्थिक अनुदान देखील दिले जाते. शेती क्षेत्रामध्ये अनेक सुशिक्षित तरुण पुढे येत असून या माध्यमातून शेतीला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देण्याचे काम यांच्या माध्यमातून होत आहे. अशा प्रकारचे स्टार्टअप शेतकऱ्यांना बऱ्याच प्रमाणामध्ये सहाय्यकारी ठरत आहेत. असेच एक स्टार्टअप झारखंडचे प्रसिद्ध टीव्ही अभिनेता राजेश सिंह हे घेऊन आले आहेत. त्यांच्या हे स्टार्टअप धनबाद, बोकारो आणि गिरी डोह येथील शेतकऱ्यांसाठी खूप वरदान ठरणार आहे.

नक्की वाचा:कामाची माहिती: डेअरी फार्मिंग सुरू करायचे असेल मिळते लोन आणि सबसिडी, अशा पद्धतीने करा डेअरी फार्मिंगची सुरुवात

 काय आहे हे मेरा फॅमिली फार्मर स्टार्टअप?

 या स्टार्टअप च्या माध्यमातून झारखंडमधील धनबाद, बोकारो आणि गिरीडोह या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला हा  बाजार भावापेक्षा जास्त भावात विकता येणार आहे.

या कामासाठी बोकारो येथील कृषी उत्पादनाचे संचालक रवी सिंग चौधरी यांचे राजेश सिंग यांना  सहकार्य लाभत आहे. झारखंड राज्यातील शेतकऱ्यांचे शेती उत्पादन आता थेट कोलकत्ता येथील मेरा फॅमिली फार्मर ॲपद्वारे विकले जाणार आहे. या स्टार्टअपच्या सुरुवातीला राजेश सिंह यांनी या तीनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे सहा टन भाज्यांची ऑर्डर दिली आहे. विशेष म्हणजे राजेश सिंग यांचा हा स्टार्टअप गेल्या दोन वर्षापासून मुंबईत सुरू आहे. या स्टार्ट-अप च्या माध्यमातून ते बॉलिवूड कलाकारांच्या घरी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाला आणि फळांचा पुरवठा करतात. याबाबत माहिती देताना कृषी उत्थान  संघटनेचे संचालक रवी सिंह यांनी म्हटले की, मेरा फॅमिली फार्मर स्टार्टअप साठी ते धनबाद च्या चंदन की यारी, चास, निरसा, बागमारा आणि गिरी डोह येथील चाळीस ते पन्नास प्रगतिशील शेतकरी संघटनेशी संबंधित आहेत.

 हे सर्व शेतकरी सेंद्रिय शेती पद्धतीचा सराव करत आहेत आणि विषमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन करतात. हे भाजीपाल्याचे उत्पादन करत असताना ते कुठल्याही प्रकारचा रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर करीत नाहीत. विशेष म्हणजे ग्राहकांची ज्याप्रमाणे मागणी असेल त्याप्रमाणे भाजीपाल्याच्या उत्पन्नानुसार ते टोपल्याच्या साईज प्रमाणे डिझाईन केले आहेत. ज्या टोपल्यांमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात.

नक्की वाचा:QR कोड स्कॅन करून तुम्हीसुद्धा पेमेंट करतात! तर सावधान तुमचा पैसा जाऊ शकतो दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये, वाचा याबद्दल सविस्तर माहिती

 हा होईल  शेतकऱ्यांना फायदा

 मेरा फॅमिली फार्मर या स्टार्ट अप मध्ये भाजीपाला विकून शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. समजा एखाद्या शेतकऱ्याने जर हंगाम नसताना भाजीपाल्याचे उत्पादन घेतले तरीदेखील त्याला चांगला भाव दिला जातो. 

बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकताना व्यापाऱ्यांशी बार्गेनिंग करावी लागते. एवढेच नाही तर दर दिवशी भाजीपाल्यांचे भाव देखील सारखे मिळत नाहीत. परंतु किसान उत्थान समितीत सहभाग घेतल्यानंतर आता वर्षभर  केव्हाही कोणत्याही हंगामात भाजीपाला पिकवला तरी त्याला चांगला भाव मिळतआहे.

English Summary: mera family farmer startup give more rate to farmer vegetable Published on: 06 April 2022, 08:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters