1. बातम्या

मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव; आता शेतकऱ्यांचे नशीब बदलणार, करा वेळीच पेरणी

सध्या मक्याची किंमत एमएसपीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी कमाईचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यावर्षी एमएसपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे. त्यामुळे आता मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) 800 रुपयांनी कमी दराने विकल्या जाणाऱ्या मक्याचे नशीब बदलले आहे. यावर्षी एमएसपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव;

मक्याला मिळतोय MSP पेक्षा जास्त भाव;

सध्या मक्याची किंमत एमएसपीपेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी कमाईचा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यावर्षी एमएसपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे. त्यामुळे आता मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढण्याची शक्यता आहे. किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) 800 रुपयांनी कमी दराने विकल्या जाणाऱ्या मक्याचे नशीब बदलले आहे.

यावर्षी एमएसपीपेक्षा जादा दराने विक्री होत आहे. त्यामुळे मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कृषी शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. 2022-23 साठी किमान आधारभूत किंमत केंद्र सरकारने 1962 रुपये प्रति क्विंटल निश्चित केली आहे. तसेच खुल्या बाजारात त्याची किंमत जवळपास 2600 रुपये आहे.

जर तुम्हाला या पिकात फायदा दिसत असेल तर पेरणीसाठी हीच योग्य वेळ आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मक्याची लागवड मागासली आहे आणि यावर्षीच्या पेरणीत २३.५३ टक्के घट झाली आहे. सध्या जर शेतकऱ्यांना पेरणी करायची असेल, तर प्रमाणित स्त्रोताकडूनच बियाणे खरेदी करा आणि तुम्ही खरेदी करत असलेल्या जातीमद्धे उत्पन्न किती आणि कसे आहे याची माहिती घ्या.

Rain Update: पुणे वेधशाळेने पावसाबाबत दिली ‘ही’ महत्वाची माहिती; वाचा...

शेतकऱ्यांनो या वाणाची करा लागवड -
भारतीय मका संशोधन संस्थेचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शंकर लाल जाट यांच्या म्हणण्यानुसार, संकरित वाणांमध्ये पीजे एचएम १, एलक्यूएमएच १, पुसा सुधारित एचक्यूपीएम १ आणि पीएमएच ३ या वाणांची पेरणी आता सुरू करू शकता. बियाण्याचे प्रमाण हेक्टरी २० किलो ठेवा. सध्याचे हवामान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी या आठवड्यात बांधावर मका पेरा. ओळी ते ओळीचे अंतर 60-75 सेमी आणि रोप ते रोप अंतर 18-25 सेमी ठेवा. मक्यावरील तणनियंत्रणासाठी एट्राझीन 1 ते 1.5 किलो प्रति हेक्ट री 800 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. अशा पद्धतीने केल्यास नक्कीच तुमच्या उत्पन्नात वाढ होईल.

महत्वाच्या बातम्या:
Post Office Scheme; पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; गुंतवा फक्त 50 रुपये आणि मिळवा तब्बल 50 लाख रुपये
Donald Trump wife: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी इव्हाना ट्रम्प यांचे निधन

English Summary: Maize is getting higher price than MSP; Now the fate of farmers will change, sow on time Published on: 15 July 2022, 02:27 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters