1. बातम्या

'यंदाचं राहू द्या; आधी दोन वर्षांपूर्वीचीच नुकसान भरपाई द्या', शेतकरी आक्रमक

सध्या राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांची घरे, वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात पावसामुळे अशीच काहीशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांच्याच नशिबी आलं आहे.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
दोन वर्षांपूर्वीचीच नुकसान भरपाई द्या

दोन वर्षांपूर्वीचीच नुकसान भरपाई द्या

सध्या राज्यातील काही भागात पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांची घरे, वाहने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात पावसामुळे अशीच काहीशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांच्याच नशिबी आलं आहे. मागील दोन वर्षांपासून पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे.

वर्धा जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी आपत्तीकाळात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. मात्र त्याची नुकसान भरपाई अजूनही शासनाकडे प्रलंबित आहे. तब्बल १७८ कोटी ३३ लाख ५० हजार ३२० रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही.

आता मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचीही नुकसान भरपाई देण्याचं खुद्द मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल आहे. मात्र दोन वर्षांपूर्वीचीच नुकसान भरपाई मिळाली नाही, आता यावर्षीची कशी आणि कधी मिळणार? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीमुळे २०२० साली जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार २५७ हेक्टरवरील सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांचं मोठे नुकसान झाले होते. कपाशीच्या बोंडअळीमुळे १ लाख ८१ हजार ३२० शेतकऱ्यांचे नुकसान झाले होत , तर सोयाबीनच्या खोडकिडीमुळे १ लाख ४८ हजार २५० शेतकऱ्यांच नुकसान झाले होते.

Organic Fertilizers: अवघ्या 18 दिवसात शेतकऱ्यांचे जीवन बदलेल; 'या' सेंद्रिय खताची होतेय चर्चा

नुकसान भरपाईसाठी लागणारी सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकाऱ्यांकडून १७८ कोटी ३३ लाख ५० हजार ३२० रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र दोन वर्ष उलटले तरी नुकसान भरपाई नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी यंदाचं राहू द्या आधी दोन वर्षांपूर्वीची नुकसान भरपाई द्या असा टोला शिंदे -फडणवीस सरकारला लगावला.

नुकतीच नागपूर येथे आयुक्त कार्यालयात आढावा बैठक पार पडली तेव्हा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. तसेच तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:
राजकारणात खळबळ! एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; निवडणूक आयोगासमोर ५० आमदारांसह...
राजू शेट्टी ॲक्शन मोडमध्ये; उसाप्रमाणे दुधाला हमीभाव जाहीर करावा, नाहीतर...

English Summary: 'Let it be this year, first pay compensation for two years ago' Published on: 23 July 2022, 05:33 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters