1. बातम्या

बदलेल नशीब हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांचे, होईल मदत केसर शेतीची

हिमाचल प्रदेश मधील चंबा, कुल्लू, मंडी आणि किन्नर या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात केसर शेती करीत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 35 ते 49 क्विंटल केसर बियाणे लावले जाण्याची शक्यता आहे. केसर शेती चा विचार केला तर समुद्र सपाटीपासून पंधराशे ते पंचवीससे मीटर उंचीवर केशर शेती केली जाते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
kesar farming

kesar farming

हिमाचल प्रदेश मधील चंबा, कुल्लू, मंडी आणि किन्नर या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात केसर शेती करीत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 35 ते 49 क्विंटल  केसर बियाणे लावले जाण्याची शक्यता आहे. केसर शेती चा विचार केला तर समुद्र सपाटीपासून पंधराशे ते पंचवीससे मीटर उंचीवर केशर शेती केली जाते.हिमाचल प्रदेश मधील चंबा, कुल्लू, मंडी आणि किन्नर या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात केसर शेती करीत आहेत. या चार जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 35 ते 49 क्विंटल  केसर बियाणे लावले जाण्याची शक्यता आहे. केसर शेती चा विचार केला तर समुद्र सपाटीपासून पंधराशे ते पंचवीससे मीटर उंचीवर केशर शेती केली जाते.

केसर शेती साठी केसर ची लागवड केल्यानंतर लगेच सिंचनाची आवश्‍यकता असते. त्यामुळे चंबा जिल्ह्यातील भर्मोर सलोनी आणि तिसा या उंचावरील क्षेत्राचा केसर लागवडीसाठी निवड करण्यात आली आहे. भरमौर, सलोनी आणि तिसा या क्षेत्रात ट्रायल म्हणून केसर शेती ची लागवड करून ते आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे.

 वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद ( सी एस आय आर ) पालमपूर चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राकेश राणा यांनी सांगितले की, चंबा, कुल्लू, मंडी आणि किन्नोर या परिसरात केसर शेतीसाठी हिमाचल प्रदेश सरकारने एम ओ यु साईन केला आहे या चार जिल्ह्यांमध्ये जवळजवळ 35 ते 40 क्विंटल केसरची बियाण्याची लागवड करण्यात आली आहे.

तसेच निदेशक संजय कुमार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सदृढ करण्यासाठी केशर शेतीला चालना दिली जात आहे व त्याविषयी शेतकर्‍यांमध्ये जागृती निर्माण केली जात आहे. तसेच हिमाचल प्रदेश मधील नाचण आणि सराज येथील शेतकरी ईतर नदी पिकांसोबत हिंग आणि केसर शेतीकडे वळले आहेत आयएचबीटी पालमपूर सहकार्यामुळे कृषी विभाग शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी शेतकऱ्यांना हिंग आणि  केसरची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. वर्ष 2019 आणि 21 मध्ये या क्षेत्रात हिंग आणि केसर प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली होती व ती यशस्वी झाली. त्यामुळे कृषी विभागाने या क्षेत्रामध्ये हिंग आणि केसर शेती शेतकऱ्यांनी करावी यासाठी पूर्ण तयारी केली आहे. कृषी क्षेत्रातील तज्ञ धर्म चंद्र चव्हाण यांनी सांगितले की साठ शेतकरी केसर आणि 35 शेतकरी हे आय एच बी टी च्या माध्यमातून केसर आणि हिंग ची शेती केली जाईल.

 

 हिमाचल प्रदेश मध्ये नाचण आणि सराज मध्ये चैल चौक, मोविसेरी, खनियारी, ओहन, बडीन, तांदी, गेर, भलो टी, बाग, रही धार, कटयांदी, शरण, धलवास, कुरा हानि,चकदयाला,करसला,  डुंगधार, शमनोस, बनिसेरी, शांगरी, मुराटण, ग्वाड, काफलू, तारौर इत्यादी ठिकाणी हिंग आणि केसरची शेती केली जाणार आहे. नाचन, सिराज या क्षेत्रात हिंग आणि केसर ची ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आता पूर्ण विभागात शेतकऱ्यांकडून केसर आणि हिंगची शेती केली जाणार आहे. या क्षेत्रातील थंड आणि गरम क्षेत्राची निवड या शेतीसाठी केली गेली आहे.  नाचण आणि सराज येथील जवळजवळ शंभर शेतकरी हिंग आणि केसरची शेती करणार आहेत.

English Summary: kesar farming Published on: 05 July 2021, 11:01 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters