1. बातम्या

क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात

मागील दोन दिवसात कोकणात वादळी पाऊस पडला. या पावसात गारांचा वर्षाव झाल्याने आंबा आणि काजू पिकाला चांगलाच फटका बसला आहे. उर्वरित आंबा देखील नष्ट झाल्याने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत.

mango farmers in Konkan

mango farmers in Konkan

राज्यात अवकाळी पावसाची मालिकाच सुरु असून मागील दोन दिवसात कोकणात वादळी पाऊस पडला. कोकणात गेले अनेक दिवस असह्य उकाडा जाणवत होता. अंगाची लाही लाही होता असताना लोक गरमीने हैराण झाले होते. त्यात अचानक पावसाच्या धारा कोसळल्याने शेतकऱ्यांची मोठी पळापळ पहायला मिळाली. या पावसात गारांचा वर्षाव झाल्याने आंबा आणि काजू पिकाला चांगलाच फटका बसला आहे.

उर्वरित आंबा देखील नष्ट झाल्याने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत. चिपळूणमध्ये अचानक तुफान आणि वादळी पावसाने हाहाकार उडून दिला. विजांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने आंबा, काजूंची झाडे उन्मळून पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, साखरपा, देवरुख, संगमेश्वरसह रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.

तर दुसरीकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली असल्याचे सांगण्यात येत आहे. आवक वाढल्याने दर देखील कमी होत असून अक्षय तृतीयेला सर्वसामान्यांना आंबा खरेदी करता येणार आहे. मात्र, अद्याप देखील मोठ्या प्रमाणात आंबा पेटी बाजारात दाखल झाली नसल्याने यंदा आंबा दर पूर्वीएवढे आवाक्यात येतील असे वाटत नाही. आजही चांगल्या आंब्याला ७०० ते ८०० रुपये डझन दर आहेत. हापूस आंब्याला अवकाळी पावसाचे लागलेलं ग्रहण बघून इतर आंब्याच्या जाती मुंबई बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत.

कर्नाटक, केरळ हापूस, उत्तर भारतातील बदामी, लालबाग आणि तोतापुरी आंबा बाजारात यंदा हापूसला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, रायगड आणि जुन्नर हापूसची चवच निराळी असल्याने ग्राहक आंब्याच्या दराकडे डोळे लावून बसला आहे. तर पुढील महिन्यात आवक मोठया प्रमाणात होऊन परवडणाऱ्या दरात ग्राहकांना आंब्याचा स्वाद चाखता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितले महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे खरे कारण, म्हणाले शरद पवार..
सनीच्या वाढदिवसाची राज्यात चर्चा!! चांदीची गदा देऊन केला वाढदिवस केला साजरा..

English Summary: It should not have happened in a moment, the farmers in Konkan were in big trouble Published on: 24 April 2022, 03:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters