1. बातम्या

या जिल्ह्यातील शेतकरी घेत आहेत मोत्यांचे उत्पादन, जाणून घेऊ या शेतकऱ्यांच्या यशाविषयी

शेतकरी सध्या शेतीची परंपरागत पद्धतीत सोडून तसेच परंपरागत चालत येणारी पिके टाळून तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची उत्पादने शेतीत घेत आहेत. शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने शेतीक्षेत्र एक टेक्निकल हब म्हणून उदयास येत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
pearl farming

pearl farming

शेतकरी सध्या शेतीची परंपरागत पद्धतीत सोडून तसेच परंपरागत चालत येणारी पिके टाळून तंत्रज्ञानावर आधारित आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची उत्पादने शेतीत घेत आहेत. शेती क्षेत्रामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्याने  शेतीक्षेत्र एक टेक्निकल हब म्हणून उदयास येत आहे.

शेतकरी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून स्वतःच्या आर्थिक प्रगती साधताना दिसत आहेत.त्याचाच एक भागम्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी चक्क मोत्यांचे उत्पादन घेतआहेत.या लेखात आपण आपण या शेतकऱ्यांच्या प्रयोगाची माहिती घेऊ.

 उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी घेताहेत मोत्यांचे उत्पादन….

 उस्मानाबाद जिल्ह्यातील बरेच शेतकरी सध्या मोत्यांची शेती करून मोत्यांचे उत्पादन घेत आहेत. तसे पाहता हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग आहे. याबाबतची माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील दहा युवक शेतकऱ्यांनी एप्रिल 2015 मध्ये श्री भवानीशंकर ऍग्रो प्रोडूसर कंपनीची स्थापना केली आहे.

या कंपनीच्या माध्यमातून शेतीला लागणारे अवजारे तसेच दूध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचे काम चालू होते. हे सगळे काम चालू असताना शेतीला एक चांगला जोडधंदा मिळावा व उत्पन्न अधिक मिळावी यासाठी त्यांनी चक्क मोत्यांचे उत्पादन घेण्याचे ठरविले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील किसान विकास ऍग्रो पर्ल फार्मिंग नावाच्या कंपनीशी करार करून मोती शेतीसाठी लागणारे दोन हजार शिंपले खरेदी केली आणितेशेततळ्यामध्ये सोडले.हे शिंपले त्यांनी 85 रुपये भावाने खरेदी केली असून औषध खर्च व इतर पकडून दोन लाखांची गुंतवणूक केली आहे. 

या शेतकऱ्यांनी किसान विकास ऍग्रो पर्ल फार्मिंग कंपनीशी करार केल्या नंतर 12 महिन्याच्या नंतर या शिंपल्यातील मोती 365 रुपये दराने विकण्याचा करार देखील केला आहे.यामध्ये तीस टक्के नुकसान हे अंदाजे धरून उर्वरित 70 टक्के शिंपल्यातील मोती यांचे पाच लाखांचे उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. यामध्ये त्यांनी केलेली दोन लाखांची गुंतवणूक वजा केली तर निव्वळ नफा तीन लाख रुपये त्यांना मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे.

English Summary: in usmanabaad district farmer doing pearl farming through fpo Published on: 24 January 2022, 03:16 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters