1. बातम्या

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आता थकीत वीज बिल होणार ऊस बिलातून कमी

शेतकऱ्यांचे जे थकीत वीज बिल आहे त्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जे की थकीत वीज बिल आता उसाच्या बिलातून वसूल करण्याचे आदेश महावितरण विभागाला देण्यात आले आहेत. हे आदेश पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिले गेले आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितली आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
sugarcane bill

sugarcane bill

शेतकऱ्यांचे जे थकीत वीज बिल आहे त्यासाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जे की थकीत वीज बिल आता उसाच्या बिलातून वसूल करण्याचे आदेश महावितरण विभागाला देण्यात आले आहेत. हे आदेश पाच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिले गेले आहे अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितली आहे.

पाच जिल्ह्यातील साखर कारखाना संचालकासोबत बैठक :

महावितरण विभागाची मागणी होती की शेतकरी वर्गाचे जे थकीत असणारे वीज बिल आहे ते साखर कारखाना कडून वसूल करण्यात यावे.याबाबत जी बैठक  घेण्यात  आली  त्या  बैठकीत साखर आयुक्त वर्गाने थकीत असलेले जे वीज बिल आहे ते साखर कारखाना वसूल करावे असे संचालक बैठकीत ठरले.सातारा  जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर  जिल्हा, सोलापूर  जिल्हा आणि पुणे जिल्हा अशा पाच जिल्ह्यातील साखर कारखाना संचालकांसोबत जी बैठक झाली त्या बैठकीत याबद्धल चर्चा झाली. याबाबत साखर कारखाना संचालकांनी असे सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत बोलून तुम्हाला कळवतो.

महावितरण विभागाकडून थकीत वीज बिल वसुली च्या संदर्भात साखर कारखाना आयुक्तांनी आदेश काढावा यासाठी विनंती केली होती. मात्र याबाबत साखर कारखाना संचालक वर्गाकडून कोणत्याही प्रकारची आश्वासन देण्यात आले नाही.शेतकऱ्यांचे वीज बिल थकीमुळे महावितरण विभाग संकटात आले आहे. राज्यामध्ये जर थक बाकीचा विचार केला तर सर्वात जास्त थक बाकी कृषी धारक वर्गाची आहे आणि हीच थकबाकी वसूल करण्याचे आवहान आता महावितरण विभागाकडे आले आहे.

मागील आठवड्यात जी बैठक झाली त्यामध्ये दहा एचपी आणि त्यावरील शेती पंपाचे ग्राहक, पाच लाख रुपये थक बाकी आणि त्यावर अजून असणाऱ्या थक बाकी  लोकांच्या  विरोधात  एक विशेष मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना दिली गेली होती.

English Summary: Important news for sugarcane growers, electricity bill will be reduce from the sugarcane bill Published on: 07 November 2021, 04:38 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters