1. बातम्या

शेळीपालनासाठी 'या' तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार 50% अनुदान

मुंबई : आजही केवळ शेती या मुख्य व्यवसयावर अवलंबून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय असायलाच पाहिजे. दु्ग्धव्यवसाय असल्यास आपल्याला अधिक नफा होत असतो, परंतु सुरुवात करण्यासाठी आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागते. यामुळे शेळीपालन ही कमीत भांडवलमध्ये सुरू होणारा जोडव्यवसाय आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
शेळीपालन

शेळीपालन

आजही केवळ शेती या मुख्य व्यवसयावर अवलंबून कुटूंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे शेती या मुख्य व्यवसायाला जोडव्यवसाय असायलाच पाहिजे. दु्ग्धव्यवसाय असल्यास आपल्याला अधिक नफा होत असतो, परंतु सुरुवात करण्यासाठी आपल्याला मोठी गुंतवणूक करावी लागते. यामुळे शेळीपालन ही कमीत भांडवलमध्ये सुरू होणारा जोडव्यवसाय आहे.

विशेष म्हणजे या व्यवसयाला सरकारही पाठबळ देत आहे. सध्या बाजारात बोकडाचे दर आणि वाढणारी मागणी पाहता शेती व्यवसायाला हा जोड व्यवसाय दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत मिळू शकते. या व्यवसायाला राज्य सरकारडून अनुदान दिले जात आहे. त्यासाठी काय कागदपत्रे आवश्यक आहेत याची माहिती घेणार आहोत.

काळाच्या ओघात उत्पादनाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा कलही जोडव्यवसायाकडे वाढत आहे. शिवाय हा व्यवसाय शेती संबंधीच असल्याने यामध्ये काही अडचणी निर्माण होत नाहीत. तरुणांना देखील आपला एखादा व्यवसाय उभारण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. याकरिता 50 टक्के अनुदानही मिळते. मात्र, त्यासाठी आवश्यक पध्दती माहीत असणे आवश्यक आहे.

 

शेळीपालन अनुदान योजना महराष्ट्र 2021 अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या अनुशंगाने पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा तसेच दुसर्‍या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्हयांसाठी 20 शेळ्या आणि 2 बोकडसाठी आर्थिक मदत करणार आहे. सरकार शेळीपालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्रसाठी अनुदान उपलब्ध करून देत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून ही योजना राबवली जात आहे.

व्यवसायासाठी 50 टक्के अनुदान

शेळी गटाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यास सुरुवातीला 2 लाख 31 हजार 400 रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये शेळ्यांसाठी बंदिस्त वाड्याची उभारणी करावी लागणार आहे. शिवाय याची उभारणी ही शेतकऱ्याला आधी स्वत खर्च करावे लागतील. प्रत्येक प्रवर्गासाठी हीच अट असून याच्या 50 टक्के निधी हा शेळी वाड्याच्या उभारणीनंतर अनुदान स्वरुपात दिली जाणार आहे. मात्र, याकरिता सर्व प्रकल्प उभा केल्यानंतरच अनुदानाची प्रक्रिया करता येणार आहे.

हेही वाचा : 'ह्या' विदेशी शेळींचे अशा पद्धत्तीने पालन करून तुम्हीही करू शकता तगडी कमाई! जाणुन घ्या सविस्तर

20 शेळ्या, 2 बोकड योजना :

योजनेचे स्वरुप हे सरकारने ठरवून दिलेले आहे. या पध्दतीने शेळी आणि बोकडाची खरेदी केली तर हा व्यवसाय लहान स्वरुपात किंवा शेतकऱ्यांच्या क्षमतेनुसार सुरू करता येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना 20 शेळ्या 6 हजार रुपये किमतीच्या तर 2 बोकड हे 8 हजार रुपये किमतीचे खरेदी कराव्या लागणार आहेत. 

म्हणजे एकूण 1 लाख 36 हजाराची खरेदी करावी लागणार असून अनुदानस्वरुपात शेतकऱ्यांना 68000 हजार रुपये हे मिळणार आहेत. तर शेळ्यांच्या गोठा 450 चौ.फु बांधावा लागणार आहे. 212 चौ.फु यामप्रमाणे गोट्याला 95000 हजार रुपये खर्च येणार असून पैकी 47500 रुपये शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपाच मिळणार आहे.

English Summary: Farmers in these three districts will get 50% subsidy for goat rearing Published on: 27 October 2021, 06:36 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters