1. बातम्या

ज्वार संशोधन केंद्राच्या वतीने 'पौष्टिक तृणधान्य दिन' साजरा

केंद्र शासनाने सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व तोंडापुर (जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुकयातील आदिवासी गाव मौजे वाई येथे दि. 16 नोव्हेबर रोजी “पौष्टिक तृणधान्य दिन” साजरा करण्यात आला.

KJ Staff
KJ Staff


केंद्र शासनाने सन 2018-19 हे वर्ष राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन त्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ज्वार संशोधन केंद्र व तोंडापुर (जि. हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कळमनुरी तालुकयातील आदिवासी गाव मौजे वाई येथे दि. 16 नोव्हेबर रोजी 'पौष्टिक तृणधान्य दिन' साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी म्हेञे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन वाईचे सरपंच श्री. सखुराव मुकाडे हे उपस्थित होते. तोंडापुर कृषी विज्ञान केंद्राचे कृषिविद्या विषय विशेषतज्ञ प्रा. राजेश भालेराव, गृहविज्ञान विषय विशेषतज्ञ प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे, ज्वार किटकशास्ञज्ञ डॉ. मो. ईलियास, ज्वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, ज्वार कृषिविद्यावेत्ता डॉ. दीपक लोखंडे, ज्वार विकृतीशास्ञज्ञ डॉ. विक्रम घोळवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजी म्हेञे मानवाच्या आहारातील ज्वारीचे महत्व सांगितले तर प्रा. श्रीमती आर. बी. शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गास ज्वारीतील पौष्टिक घटकाचे महिलांच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणामाचे महत्व सांगितले. प्रा. राजेश भालेराव यांनी शेतकरी बंधुनी सुधारित ज्वारी लागवड व्‍यवस्‍थापनावर तर डॉ मो. ईलियास यांनी ज्वारी पिकावरील अमेरिकन लष्कर अळी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी ज्वार संशोधन केंद्रातील शास्‍त्रज्ञ लिखित 'आरोग्यवर्धक ज्वारीचे आहारातील पोष्टिक महत्व व मुल्यवर्धीत पदार्थ' या घडीपञिकेचे विमोचन करुन उपस्थित शेतकरी बंधुना वाटप केले. तसेच ज्वारीपासुन विविध तयार केलेले बिस्कीट, पापड, मैदा, शेवया, लाहया आदी पदार्थ दाखवण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. एल. एन. जावळे यांनी केली. सुञसंचालन डॉ. दीपक लोखंडे यांनी तर आभार डॉ. विक्रम घोळवे यांनी मानले. कार्यक्रमास आदिवासी शेतकरी व महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रम कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्या प्रेरणेने व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

English Summary: Celebrate 'Millet Day' on behalf of Sorghum Research Center Published on: 20 November 2018, 08:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters