1. बातम्या

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे निश्चित, अनेकांना धक्का

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीबरोबरच विधान परिषेदेच्या निवडणुकीनेही ( Vidhan Parishad Election ) जोर धरला आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, यातच आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
BJP candidates Legislative Council

BJP candidates Legislative Council

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात सध्या राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) निवडणुकीबरोबरच विधान परिषेदेच्या निवडणुकीनेही ( Vidhan Parishad Election ) जोर धरला आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, यातच आता विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे अनेकांनी फिल्डिंग लावली आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेच्या (Legislative Council) निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. आता भाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित झाली आहे. भाजपच्या (BJP) या यादीमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांसह, भाजप नेते प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांच्या नावावर एकमत झाले आहे. यामुळे सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नाही.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल, असं काल बोललं जातत होतं. तसेच हर्षवर्धन पाटील यांना देखील उमेदवारी मिळाली नाही. थोडक्यात पराभव झालेले हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागणार का याची चर्चा इंदापूर तालुक्यात रंगली होती. आगामी निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला आणि इतर ठिकाणी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपने तयारी केल्याचे समजत आहे.

Post Office Scheme; बातमी कामाची! पोस्ट ऑफिसची नवीन योजना, १० हजार भरा आणि १६ लाख मिळवा

राष्ट्रवादीकडून देखील उद्या अर्ज दाखल केले जाणार आहेत. यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांची नावे चर्चेत आहेत. यामुळे पक्ष नेमकं कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भाजपकडून चार जणांना सहज विधान परिषदेवर संधी मिळू शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
कौतुकास्पद! 'फार्मर प्रोड्युसर'द्वारे पुरंदरचे जगात नाव, तरुणांनी करून दाखवले..
चांदुरच्या तहसील कार्यालयाला कांद्याचे तोरण, कांदा प्रश्नाबाबत शेतकरी आक्रमक

English Summary: Big news! names BJP candidates Legislative Council have been finalized Published on: 08 June 2022, 01:00 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters