1. बातम्या

चिंता कायम!! साखर उत्पादनात महाराष्ट्राचीच बाजी, मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे..

सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्यात आला आहे. असे असताना साखर उत्पादनात महाराष्ट्रानी बाजी मारली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 250 लाख टन (Sugar Production) साखरेचे उत्पादन झालेले आहे. 250 लाख टन साखर ही देशात उत्पादित झाली असली तरी राज्यात 97 लाख टनाचा आकडा पार केला आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
sugarance

sugarance

सध्या ऊस गाळप हंगाम अंतिम टप्यात आला आहे. असे असताना साखर उत्पादनात महाराष्ट्रानी बाजी मारली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत देशात 250 लाख टन (Sugar Production) साखरेचे उत्पादन झालेले आहे. 250 लाख टन साखर ही देशात उत्पादित झाली असली तरी राज्यात 97 लाख टनाचा आकडा पार केला आहे. महाराष्ट्रातच अधिकचे उत्पादन वाढत आहे. असे असताना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम असल्याने यंदा साखर आयुक्त यांच्या परवानगीनंतरच कारखान्यांचे गाळप हे बंद होणार आहे. यामुळे आता देखील शेतकऱ्यांची ऊस तोडणीसाठी धडपड सुरु आहे.

असे असताना देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन हे महाराष्ट्रात झाले आहे. यावर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच महाराष्ट्राने पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. 97 लाख टन साखरेचे उत्पादन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले होते. तर आता मार्चमध्ये 100 लाख टन होईल असा अंदाज आहे. अजूनही राज्यात १० टक्के ऊस शिल्लक असल्याचे सांगितले आहे. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशने यंदा महाराष्ट्रात 126 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

यंदा विक्रमी असे साखरेचे उत्पादन राज्यातून झाले आहे. तर उत्तरप्रदेशात 68 लाख टन साखर तयार झाली आहे. तसेच इतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर साखरेचे उत्पादन वाढले आहे. यामुळे अतिरिक्त उत्पादनाच प्रश्न वाढला आहे. सध्या ज्यांचे ऊस राहिले आहेत त्यांना मात्र झोप येत नाही. अनेकांनी ऊस देखील पेटवले आहेत. तसेच उसाला हुमणी देखील लागली आहे. यामुळे वजनात घट होणार आहे. यंदा ऊसतोड शिल्ल्क राहिल्याने हंगाम लांबणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.

यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार का? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्याच्यापुढे आहे. फडातील ऊसाचा कार्यकाळ हा संपलेला असल्याने आता वजनात घट होत आहे. शिवाय हंगाम वाढवण्यात आला तरी प्रत्यक्षात ऊसतोड होणार की नाही याबाबत शंका आहे. अधिकचे क्षेत्र असून पावसाळा सुरु होण्यापू्र्वी देखील ऊसाचे गाळप होते की नाही ही शंकाच आहे. यामुळे प्रश्न कायम आहेत.

English Summary: Anxiety persists !! Maharashtra's only bet in sugar production, but farmers' questions were like .. Published on: 06 March 2022, 04:09 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters