1. बातम्या

आनंद महिंद्रा यांचा मोठा निर्णय! वैद्यकीय अभ्यासासाठी भारतीय विद्यार्थ्यांना विदेशी जाण्याची गरज नाही तर आता..

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.यातील बहुसंख्य विद्यार्थी हे युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-starsunfolded

courtesy-starsunfolded

सध्या रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत.यातील बहुसंख्य विद्यार्थी हे युक्रेन मध्ये  वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत.

जेव्हा  हे युद्ध सुरू झाले तेव्हा युक्रेन मध्ये अडकलेले विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याची बाब समोर आली. त्यानंतर याबाबत चर्चा सुरू झाली की युक्रेनमध्ये मेडिकलला जाणाऱ्यांची संख्या जास्त का आहे? आता नुकतीच एका भारतीय विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला. तेव्हा त्या मुलाच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलाला चांगले मार्क असून देखील मेडिकलमध्ये भारतात प्रवेश मिळाला नाही.तसेच आपल्याकडच्या खाजगी कॉलेज पेक्षा युक्रेनमधील शिक्षणाचा खर्चही कमी आहे. या सगळ्या परिस्थितीवर सध्या महिंद्रा अँड महिंद्रा चे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा त्यांनी या बाबतीत एक ट्विटकेले आहे.

यामध्ये त्यांनी भारतातील वैद्यकीय महाविद्यालयांची जी कमतरता आहे त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पुढे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय संस्था स्थापन करण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं.मला कल्पना नव्हती की भारतात वैद्यकीय महाविद्यालयांची इतकी कमतरता आहे. टेक महिंद्रा चे एमडी आणि सीईओ सी पी गुरनानी यांना टॅगकरत विचारतात ते महिंद्रा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये वैद्यकीय अभ्यास संस्था  आपण स्थापन करू शकतो का? याबाबत चाचपणी त्यांनी सुरू केली असून आनंद महिंद्राहे दिलेला शब्द पाळण्यासाठी ओळखले जातात. 

त्यामुळे येणाऱ्या काळात महिंद्रा विद्यापीठात मेडिकल कॉलेज दिसतील. त्याबद्दल आश्चर्य वाटायला नको. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या 18095 भारतीय विद्यार्थ्यांपैकी सुमारे नव्वद टक्के विद्यार्थी मेडिकलचे शिक्षण घेत आहेत. या आकडेवारीवरून हेदिसून येते की आपल्याकडची मेडिकल शिक्षणाची स्थिती काय असेल.

English Summary: ananad mahindra take big dicision about indian medical student Published on: 05 March 2022, 02:09 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters