1. बातम्या

'कृषी जागरण'चा 26 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

कृषी जागरण मीडिया एजन्सीने काल राजधानी दिल्लीत शानदार कार्यक्रमाद्वारे आपला २६ वा स्थापना दिवस साजरा केला. दिल्लीतील सिल्व्हर ओक येथे शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
२६ वा स्थापना दिवस साजरा केला

२६ वा स्थापना दिवस साजरा केला

कृषी जागरण मीडिया एजन्सीने (krishi jagran media house) काल राजधानी दिल्लीत शानदार कार्यक्रमाद्वारे आपला २६ वा स्थापना दिवस साजरा केला. दिल्लीतील सिल्व्हर ओक येथे शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री आणि निवृत्त आयएएस अधिकारी अल्फोन्स कन्ननथनम (Alphonse Kannanthanam) आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

कृषी जागरण माध्यम संस्थेच्या विविध भाषांच्या कृषी पत्रकारांच्या सांस्कृतिक नृत्य व संगीताने कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला. विविध राज्यातील सांस्कृतिक नृत्य व संगीत हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.

कृषी जागरणचे संस्थापक एमसी डॉमिनिक यांनी स्वागत भाषण केले. मीडिया संस्थेने गेल्या 25 वर्षांत शेतकऱ्यांच्या हितासाठी कसे मोलाचे काम केले आहे, याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी व्यासपीठावर कृषी दक्षता संचालक शायनी डॉमिनिक उपस्थित होते.

कृषी जागरणे 25 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली

कृषी जागरणे 25 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली

गेल्या 25 वर्षांपासून कृषी जागरण शेतकऱ्यांना तपशील, ज्ञान आणि माहिती देण्यासाठी सातत्याने शेतकऱ्यांशी संपर्क साधत आहे. तसेच मासिके, न्यूज पोर्टल, यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया यांसारख्या अनेक सामाजिक माध्यमांद्वारे कृषी दर्शकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.

विविध राज्यातील सांस्कृतिक नृत्य व संगीत हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण

विविध राज्यातील सांस्कृतिक नृत्य व संगीत हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण

अशा प्रकारे कृषी जागरणे 25 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली. कृषी जागरणने नेहमीच शेती आणि शेतकऱ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी पत्रकारितेच्या विस्तारासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन कल्पनांशी अद्ययावत राहण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

English Summary: 26th Anniversary Celebration of 'Krishi Jagran' concluded Published on: 11 September 2022, 05:25 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters