1. फलोत्पादन

हलक्यात घेऊ नका! जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जिवाणूच तारतील शेतीला, म्हणून वाढवा मातीमधील सेंद्रिय कर्ब

नमस्कार मित्रांनो मि मिलिद जी गोदे हा लेख आपन वाचाल व प्रतिक्रिया द्यावी आपल्या निसर्गाने जमिनीवर सर्वांना जिवन दिलं!तसेच निसर्गाने आपल्या मातीत अनेक सूक्ष्म जीवाच जिवनं निर्माण केले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
organic curb so important for growth quantity of useful bacteria in soil

organic curb so important for growth quantity of useful bacteria in soil

नमस्कार मित्रांनो मि मिलिद जी गोदे हा लेख आपन वाचाल व प्रतिक्रिया द्यावी आपल्या निसर्गाने जमिनीवर सर्वांना जिवन दिलं!तसेच निसर्गाने आपल्या मातीत अनेक सूक्ष्म जीवाच जिवनं निर्माण केले.

निसर्ग हा जिवन देणारा व जिवन घेणारा तोच आहे.तसेच पिकांच्या पोषणामध्ये अन्नद्रव्य पुरतता होण्यासाठी मोलाची भूमिका निभावत असतो तो सुक्ष्म जिव म्हणजे जिवाणू! आपल्या जमिनीची सुपीकता अबाधित ठेवण्यासाठी जैविक तंत्राची मदत हाच शेतीचा आधार ठरू शकते. जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्याचं जीवाणू, बुरशी यांसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव जिवाणू आढळून येतात.जमिनीमधील अन्नद्रव्य व इतर उपयुक्त घटक पिकाला उपलब्ध करून देण्याचे महत्वाचे कार्य हे सूक्ष्मजीव करतात. सूक्ष्म जीवांनी परीपुर्ण असलेल्या मातीला जिवंत म्हणजे सजीव माती संबोधतात. मातीची सुपीकता व उत्पादकता वाढविण्यासाठी व ती अबाधित ठेवण्यासाठी उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढण्यासाठी माती मधला कर्ब वाढवणं गरजेचं आहे.

आपण केलेल्या अंधाधुंद रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची जिवाणू च्या अन्नाची क्षमता कमी केली आहे. रासायनिक खतांच्या मुक्त वापरामुळे रसायनांचा अंश अन्नधान्यात उतरतो परिणामी विविध घातक आजार मानव व प्राणी यांना होतात.यालाच घाबरून सुरक्षित व सकस अन्नासाठी लोकांनी जैविक पद्धतींचा अवलंब  केला आहे.जैविक खतांने जमिनीची नैसर्गिक व जैविक सुपीकता टिकण्यास मदत होते परिणामी पर्यावरणाचा समतोल  राखला जातो.जिवाणू नी परीपुर्ण खतांमध्ये जमीन, पाणी व पिके यांसाठी घातक अशी कोणतीही रसायनं नसल्या मुळे उपयुक्त अशा सूक्ष्मजीव व मित्र किडींना कसलाही अपाय होत नाही.उपयुक्त असलेल्या जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या जिवाणू मुळे पिकाची रोग व कीड़ प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सूक्ष्मजीवांनी उपयुक्त असलेल्या जैविक खतांनी जमिनीत सोडलेल्या संजीवकांमुळे बियाण्याची उगवणशक्ती वाढते व पिकाची वाढ चांगली होते.मर या आजाराला बळी पडत नाहीजैविक निविष्ठा जसे खतांच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो तसेच उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.सेंद्रिय पदार्थ कुजण्यास मदत होते व नैसर्गिक पद्धतीने अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते त्याच बरोबर रोगांचेदेखील नियंत्रण होते.

जिवाणु च्या वापराणे उत्पादन खर्चात बचत होते.आता हेच पहा आपल्या भागातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याच्या प्रमुख कारणांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असे तज्ञाच मत आहे  समजून घेऊ झिंक विरघळविणारी जिवाणू व  खते जमिनीतील खनिज स्वरूपातील झिंक विरघळवून पिकांना उपलब्ध करतात परिणामी उत्पादनात वाढ होते.आपल्या द्रवरुप जिवाणू संघ म्हणजे महा एन पि के

 नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणारे जिवाणू असतात आपन जर पिकं  व्यवस्थापनासाठी नत्र, स्फुरद व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा वापर करणे आवश्यक आहे. जिवाणू संघात उपरोक्त नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद विरघळवणारे जिवाणू व पालाश उपलब्ध करणा-या जिवाणूंचा समावेश असतो. या जिवाणूंचे निर्जतुक वाहकामध्ये मिश्रण करून जिवाणू संघ तयार केला जातो. जिवाणू संघ हा पीकनिहाय तयार करता येतो व त्यामुळे शेतक-यांना वापरण्यासाठी जिवाणू संघ अतिशय उपयुक्त आहे. या सर्व गोष्टींचा आपन विचार करावा व सेंद्रिय व जैविक खतांच्या वापरात समतोल राखून जमिनीचा कस कमी होऊ न देता उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज आहे. त्याच बरोबर जैविक खताचा वापर करणे हे फायदेशीर ठरू शकते........

 

धन्यवाद

*Save the soil all together*

Mission agriculture soil information*

*मिलिंद जि गोदे*

*9423361185*

*milindgode111@gmail.com*

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Farming Business Idea : शेतकरी बांधवांनो किन्नू पिकाची लागवड करा आणि कमवा बक्कळ नफा; वाचा याविषयी

नक्की वाचा:कृषी क्षेत्रातील तरुण उद्योजकांसाठी बातमी! कोल्ड स्टोरेज साठी सरकारकडून मिळतेय अनुदान, वाचा आणि घ्या माहिती

English Summary: organic curb so important for growth quantity of useful bacteria in soil Published on: 26 April 2022, 10:17 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters