1. फलोत्पादन

अतिशय महत्त्वाचे! अतिरिक्त पाण्याच्या वापराने होत आहे जमिनीतील पोटॅश नष्ट, मातीच्या 1673 नमुन्यांची तपासणी

अंदाधुंद आणि अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जमिनीला आवश्यक असणारे बऱ्याच प्रकारची पोषक घटक व त्यांचे संतुलन बिघडत चालले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
dificency of potash is harmful for crop productivity

dificency of potash is harmful for crop productivity

अंदाधुंद आणि अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जमिनीला आवश्यक असणारे बऱ्याच प्रकारची पोषक घटक व त्यांचे संतुलन बिघडत चालले आहे.

कृषी विज्ञान केंद्र बघरा येथे जवळ जवळ याबाबतीत मातीचे 1673 नमुन्याची तपासणी करण्यात आली. उत्तर प्रदेश मधील सहारनपुर आणि मेरट  या विभागांमध्ये सगळ्यात जास्त पोट्याश कमतरता आढळून आली. यावर कृषीशास्त्रज्ञांनी म्हटले की,विनाकारण आणि गरजेपेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा केल्याने पोटॅश जमिनीत खोलवर चालले जाते. त्यामुळे रोपांच्या मुळांना पर्यंत पोटॅश पोहोचू शकत नाही. त्याचा सरळ परिणाम हा पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनावर होतो. केवीके बघरा येथील मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल कटियार त्यांनी म्हटले की, 2021 या वर्षात 931  आणि 2022 या वर्षात 742 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील मातीची परीक्षण केले. जर आपण मातीमधील पोट्याशची सामान्य मात्र याचा विचार केला तर ती 180 ते 280 किलो प्रति हेक्‍टर आवश्यक आहे.

नक्की वाचा:खरीप हंगामासाठी खतांचे नियोजन! राज्याला यावर्षी खरीप हंगामासाठी विविध ग्रेडच्या 45 लाख टन खतसाठ्यास मंजुरी

 परंतु जेव्हा या नमुन्यांची तपासणी करण्यात आली तेव्हाहे प्रमाण फक्त सरासरी 110 किलो प्रति हेक्‍टर एवढे आढळून आले.

यांच्यासोबतच कृषी विज्ञान केंद्र चित्तोडा कृषी शास्त्रज्ञ सुरेन्द्र कुमार यांनी म्हटले की, जमिनीतील पोटॅशची कमतरता होण्याचे प्रमुख कारण म्हणजे अतिरिक्त पाण्याचा पुरवठा हे होय. पाण्यासोबत पोटॅश जमिनीत खोलवर जाते आणि नंतर ती त्यांच्या मुळापर्यंत पोहोचू शकत नाही. जमिनीमध्ये ओलावा ठेवणे त्यासोबतच युरियाचा जास्त वापरव तुलनेने पोटॅश खताचा कमीत कमी वापर हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. अधिक सिंचनामुळे शेतकऱ्यांची लागणारा खर्च देखील वाढला परंतु पिकांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये कमी आली.

 पोटॅशच्या कमतरतेमुळे होणारे नुकसान

गहू,ऊसआणि अन्य पिकांची गुणवत्ता यामुळे प्रभावित होते. पिकांची पाने हे पिवळी पडतात व लुसलुशीत होतात. पानांचा आकार छोटा होतो व वाढ अचानक थांबते.

नक्की वाचा:माहितीसाठी!मलबार कडुलिंबाची लागवड ठरेल फायद्याची, वाचा याविषयीची माहिती

पिकांची लागवड चक्र देखील जबाबदार

 याबाबत कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, शेतकरी जैविक खतांचा वापर खूप कमी प्रमाणात करत आहेत. शेतकरी शेती करताना जमिनीला आराम न देता गहू आणि उसासारखे पीक जास्त प्रमाणात घेतात त्यामुळे जमिनीतील पोषक घटक कमी होत आहेत.

 मातीमध्ये फॉस्फरस आणि कार्बनिक पदार्थाची आहे कमी

 मातीमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस आणि कार्बनी पदार्थांचे देखील मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. जर प्रति हेक्टर फॉस्फरसचा विचार केला तर ते 15 ते 25 किलो याप्रमाणे आवश्यक आहे. परंतु चालू परिस्थितीत तपासणी नंतर दिसून आले की ते फक्त बारा किलो प्रति हेक्‍टर आहे.

English Summary: dificiency of potash is harmful for crop productivity and soil fertility Published on: 25 March 2022, 01:34 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters