1. आरोग्य सल्ला

रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध अवश्य प्यावे.

नमस्कार मित्रांनो, हळद ही आपल्या किचनमधील सर्वोत्तम घरगुती औषध म्हणून नेहमी धावून येते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध अवश्य प्यावे.

रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध अवश्य प्यावे.

घरगुती असा उपाय जो कोणत्याही छोट्या आजारावर आपल्यासाठी धावून येतो त्यात हळद ही असतेच. पण तुम्हाला माहित आहे का हळदीच्या दुधाचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.आपल्या आरोग्य शास्त्रात हळदीचे भरपूर उपाय सांगितले आहेत. आरोग्यासाठी हे हळदीचे दूध खूपच लाभकारी असते, त्यामुळे त्याचे सेवन करणे कधीही चांगलेच असते. आरोग्यदायी हळदीयुक्त दूध पुढीलप्रमाणे आपल्या निरोगी आयुष्यात मदत करते.शरीर दुखणे :- हळदीचे दूध शरीराच्या दुखण्यात आराम देते. हात, पाय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये दुखण्याची तक्रार असल्यास, रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध घ्या.जेव्हा दुखापत होते :- जर काही कारणास्तव शरीराच्या बाह्य किंवा अंतर्गत भागाला दुखापत झाली असेल तर हळदीचे दूध शक्य तितक्या लवकर बरे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी :- दूध प्यायल्याने त्वचेमध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते आणि दुधाबरोबर हळदीचा वापर जंतुनाशक असल्याने हळूहळू त्वचेच्या समस्या जसे की संसर्ग, खाज, पुरळ इत्यादी जीवाणू काढून टाकते. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ, निरोगी आणि चमकदार दिसते.हाडे मजबूत होतात :- दुधातील कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात आणि हळदीच्या गुणधर्मांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे हाडांशी संबंधित इतर समस्यांपासून देखील मुक्त करते.मेंदूवर होतो असा परिणाम :- निद्रानाश होत असल्यास जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे झोप येत नसेल, तर तुमच्यासाठी सर्वोत्तम घरगुती उपाय म्हणजे हळदीचे दूध. रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी अर्धा तास फक्त हळदीचे दूध प्या आणि चमत्कार पहा. हळदी मध्ये असलेले गुणधर्म आपल्या मेंदूला शांत करतात व सतत विचार,

भीती आणणे याचे प्रमाण कमी करतात. यामुळे मेंदू शांत होवून चांगली झोप लागते.सांध्यासाठी प्रभावी औषध :- हळदीचे दुध रोज सेवन केल्याने संधिवात दूर होतो, तसेच सांधे आणि स्नायू लवचिक बनतात. ज्यामुळे हालचालींवर ताण येत नाही.सर्दी झाल्यास :- सर्दी किंवा खोकल्याच्या बाबतीत हळदीच्या दुधाचे सेवन खूप फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी तर बरे होतेच, पण गरम दुधाचे सेवन करून फुफ्फुसात जमा झालेला कफही दूर होतो. हिवाळ्यात त्याचे सेवन तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते.श्वास घेण्यास त्रास होणे :- हळदीच्या दुधात असलेले अँटी-मायक्रोबियल गुणधर्म दमा, ब्राँकायटिस, सायनस, फुफ्फुसातील कण आणि कफ दूर करण्यास मदत करतात. उबदार दूध शरीरात उष्णता पसरवते, ज्यामुळे श्वासोच्छवासामध्ये आराम मिळतो.

पाचन तंत्र विस्कळीत झाल्यास- हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहतात आणि पाचन समस्या दूर होतात. पोटाचे व्रण, अतिसार, अपचन, कोलायटिस आणि मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्येही हळदीचे दूध फायदेशीर आहे.वायरल इन्फेक्शन :- हवेतील बदल आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या वायरल इन्फेक्शन्समध्ये हळदीचे दूध हा सर्वोत्तम उपाय आहे, जे तुम्हाला इन्फेक्शनपासून वाचवते. रक्तातील साखर जास्त असल्यास :- रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असताना हळदीच्या दुधाचे सेवन रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.महत्वाची सूचना- संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनीच हळद दूध प्यावे. जेवणानंतर लगेच पिणे विरुद्ध आहार ठरतो व त्यापासून अपाय होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच झोपण्यापूर्वी आर्धा ते एक तास आधी हळद दूध प्यावे. शिवाय हळद दूध कोमटच असावे ज्यायोगे ते पचायला बरे पडते.

English Summary: You must drink turmeric milk every night before going to bed. Published on: 22 May 2022, 09:00 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters