1. आरोग्य सल्ला

व्हिटॅमिन 'ए' ची गरज भागवून निरोगी राहायचंय? तर ही बातमी तुमच्यासाठी;नक्की वाचा

आपला रोजचा आहार सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार केवळ निरोगी राहण्यास मदत करत नाही तर अनेक रोगांपासून आपले संरक्षणदेखील करते.

ऋतुजा संतोष शिंदे
ऋतुजा संतोष शिंदे
पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार

पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी आपण विशेष काळजी घेत असतो. दररोज व्यायाम करणे असो किंवा मनाच्या स्वास्थासाठी चिंतन किंवा मनन करणे असो असे अनेक कार्य आपण दैनंदिन जीवनात अंमलात आणत असतो. मात्र यामध्ये आपला रोजचा आहार सर्वात महत्वाची भूमिका बजावत असते. पौष्टिकतेने समृद्ध असलेला आहार केवळ निरोगी राहण्यास मदत करत नाही तर अनेक रोगांपासून आपले संरक्षणदेखील करते.

आपल्या शरीराला योग्य व्हिटॅमिनची गरज असते. जर आपल्या शरीरात व्हिटॅमिन 'ए' ची कमतरता असेल तर दात, त्वचा आणि डोळ्यांवर याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे आजच्या या लेखात आपण व्हिटॅमिन 'ए' बद्दल बरंच काही जाणून घेणार आहोत.

व्हिटॅमिन ए आपल्या शरीरासाठी आवश्यक घटकांपैकी एक आहे. ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर जर तुम्हाला मात करायची असेल तर अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा लागेल ज्यात केवळ व्हिटॅमिन एच नाही तर इतर अनेक पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतील. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया व्हिटॅमिन ए असलेले पदार्थ.

1. टोमॅटो-
टोमॅटो ला व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत मानला जातो. साधारण आकाराच्या टोमॅटोमध्ये जवळजवळ 20 टक्के व्हिटॅमिन ए आढळते. तुम्ही सॅलड आणि भाजीच्या स्वरूपात याचा आहारात समावेश करू शकता.

टोमॅटो

टोमॅटो

2. पालक-
पालक व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर मात करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. 200 ग्रॅम पालकामध्ये साधारण 49 टक्के व्हिटॅमिन ए आढळते. याचा आहारात कच्च्या किंवा रसाच्या स्वरूपातदेखील समाविष्ट करू शकता.

५२ हजार शेतक-यांना ४७० कोटींची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

पालक

पालक

3. गाजर-
गाजर ही हंगामी भाजी आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून याचे खूप फायदे आहेत. मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 200 टक्के व्हिटॅमिन ए असते. गाजराचे सेवन पुडिंग, सॅलड, सूप भाजीच्या स्वरुपातदेखील करता येते.

गाजर

गाजर

4. केल (Kale)-

केल ही हिरवी भाजी असून याचा वापर अनेक पदार्थांमध्ये आणि सॅलडच्या स्वरूपात केला जातो. 200 ग्रॅम केलमध्ये सुमारे 200 टक्के व्हिटॅमिन ए आढळते. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही केल खाऊ शकता.

Kale

Kale

महत्वाच्या बातम्या:
गोष्ट छोटी आभाळाएवढी; छोट्या जिऱ्याचे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे
कांद्याचा वाद पुन्हा पेटला; सांगा कशी करायची शेती?

English Summary: Want to stay healthy by meeting your vitamin A needs? So this news is for you; read it for sure Published on: 19 May 2022, 06:13 IST

Like this article?

Hey! I am ऋतुजा संतोष शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters