1. आरोग्य सल्ला

वाटाणे खा आणि तंदुरुस्त राहा,हे आहेत वाटण्याचे आरोग्यदायक फायदे

आरोग्यासाठी हिरवा भाजीपाला हा फार उपयोगी असतो. विशेषता हिवाळ्यामध्ये जर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग केला तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते तसेच आरोग्यविषयक बऱ्याच समस्या कमी होतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
A pea

A pea

आरोग्यासाठी हिरवा भाजीपाला हा फार उपयोगी असतो. विशेषता हिवाळ्यामध्ये जर आहारात हिरव्या पालेभाज्यांचा उपयोग केला तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते तसेच आरोग्यविषयक बऱ्याच समस्या कमी होतात.

बरेच जण या हिरव्या भाज्यांमध्ये वाटण्याला फार महत्त्व देतात.वाटाणे मध्येप्रथिने, फायबर तसेचविविध जीवनसत्त्वे, फॉस्फरस,पोट्याशियम,  लोह, मॅग्नेशियम, तांबे आणि जस्त सारखे पोषक घटक आढळतात.हे डोळ्यांसाठी फार उपयुक्त आहे तसेच हृदयासाठी देखील महत्त्वपूर्ण आहे. या लेखात आपण वाटाण्याची आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ.

 वाटाण्याचे आरोग्यदायी फायदे

  • कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते-दररोज वाटाणा खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. हे शरीरातील ट्रायग्लिसराईड चे पातळी कमी करते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवते.
  • स्मरणशक्ती- वाटाण्याच्या सेवन केल्याने स्मरणशक्ती मध्ये सुधारणा होते. मेंदूशी संबंधित लहान-लहान समस्या दूर होतात.
  • हृदयासाठी उपयुक्त-अँटी इनफ्लेमेटरी आणि एंटीऑक्सीडेंट गुणधर्मांनीसमृद्धअसल्यानेत्याच्या सेवन हृदयाला अनेक रोगांची लढण्याचे सामर्थ्य देते.
  • हाडांसाठी उपयुक्त- वाटाणे मध्ये असलेले प्रथिन हाडे मजबूत करतात तसेचस्नायू बळकट होतात.
  • लठ्ठपणा कमी करतो- लठ्ठपणा कमी करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दररोज मुठभर वाटाणेखाणे. वाटाणे चरबी कमी करण्यास मदत करतात त्यामुळे वजन लवकर कमी होते.
  • कर्करोग प्रतिबंध- ऑंटी एक्सीडेंट आणि विटामिन के जास्त प्रमाणात असल्याने रोज कच्च्या वाटण्याच्या सेवन शरीरातील कर्करोगाच्या पेशींच्यावाढीस प्रतिबंधित करते.कर्करोग टाळण्यासाठी वाटणे हे वरदान पेक्षा काही कमी नाही.
  • पचनक्रियेत सुधारणा होते- व ठाण्यात फायबर असतात जे अन्न पाचक जिवाणूंना सक्रीय ठेवतात आणि पचन क्रिया टिकवून ठेवतात
  • मधुमेहासाठी फायदेशीर- साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारे भरपूर फायबर आणि प्रथिने असतात. यामुळे मधुमेह यासाठी फायदेशीर आहे.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी-जीवनसत्त्वे, फास्फोरस,  लोह,मॅगेनीज आणि तांबे यांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांचे सेवन प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.वाटाणा हे आजारा विरुद्ध लढण्यासाठी शरीराला सामर्थ्य देते.
English Summary: this ten health benifit to eat pea that benificial gor heart,weight loss etc. Published on: 23 December 2021, 08:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters