1. आरोग्य सल्ला

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय थांबा आधी हे वाचा

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात रोज थोडे का होईन मैद्याचे प्रमाण असते.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय थांबा आधी हे वाचा

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय थांबा आधी हे वाचा

आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात रोज थोडे का होईन मैद्याचे प्रमाण असते. मैद्यापासून बनलेले अनेक पदार्थ स्वादिष्ट लागतात. उदा- बिस्कटे,ब्रेड,समोसा,केक,रोटी, नान इत्यादी. पण तुम्हांला माहिती आहे का अति प्रमाणातील मैद्याचे आणि मैद्याच्या पदार्थचे सेवन हे तुमच्या आरोग्यस घातक ठरू शकते.मैदा आणि मैद्याचे पदार्थ हे कश्या प्रकारे आरोग्यस घातक ठरू शकतात हे आपण पाहणार आहोत

वजन वाढते - जास्त प्रमाणात मैदा सेवन केल्याने शरीराचे वजन वाढून लठ्ठपणा वाढतो एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.पचनविषयक समस्या - मैदा हा पचायला जड असतो  Digestive problems - Flour is hard to digestत्यामुळे मैद्याच्या आणि त्या पासून बनलेल्या पदार्थच्या सेवनाने पचनविषयक समस्या निर्माण होतात.मलविषक तक्ररी निर्माण होतात.मैद्यमध्ये फायबर नसल्यामुळे सततच्या मैद्याच्या पदार्थाच्या सेवनामुळे व त्यामुळे मल घट्ट होतो व इतर मलविषयक समस्या निर्माण होतात.

ऍलर्जी होण्याची शक्यतामैद्यात असलेल्या ग्लूटनामुळे खाद्यपदार्थ मऊ व चिवट बनतात परंतु हा ग्लूटना पोटाशी संबंधित ऍलर्जी निर्माण करू शकतो.संधिवात आणि हाडे कमजोर होणे.जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरवात होते, नंतर शरीरात रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यामुळे संधीवाताची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच मैदाचे पीठ बनवताना त्यातील फायबर पूर्णपणे नाहीसे करतात त्यामुळे या पिठापासून बनलेल्या पदार्थसतत सेवन केल्यामुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे कमजोर होतात.

मधुमेहाचा होण्याची शक्यता वाढते.मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी लगेच वाढते कारण मैद्यात खूप उच्च ग्लिसमिक निर्देशांक असतो.म्हणून जर आपण जास्त मैदा खाल्ला तर मग आपल्याला स्वादुपिंडाची तक्रार सुरू होतात आणि परिणामस्वरूप मधुमेह होण्याची शक्यता वाढते.या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही समुहात आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू.

 

संकलन: नितीन जाधव  

स्रोत:- आरोग्यविद्या

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ - ९१९०८२५५६६९४

English Summary: Stop eating flour and flour products and read this first Published on: 31 August 2022, 08:35 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters