1. आरोग्य सल्ला

रात्री झोपण्याआधी गूळ खाऊन गरम पाणी पिल्याने होतात ‘हे’ फायदे; वाचा काय आहेत फायदे

चवीला गोड आणि स्वभावाने गरम असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे, जो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, दररोज रिकाम्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्यास गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jaggery health benifit

jaggery health benifit

चवीला गोड आणि स्वभावाने गरम असलेला गुळ अनेक पौष्टिक घटकांसह समृद्ध आहे, जो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, दररोज रिकाम्या पोटी गूळ खाऊन एक ग्लास गरम पाणी पिल्यास गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता या समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे.

सेंद्रिय गूळ आणि केमिकल फ्री गूळ यामध्ये फरक आहे. सेंद्रिय गुळाची निर्मिती करत असताना उसाची लागवड ही सेंद्रीय पद्धतीने केली जाते. त्यानंतर गूळ निर्मिती करताना त्यात कोणतेही रसायन वापरले जात नाही. अशा पद्धतीने बनवलेल्या गुळाला सेंद्रिय गूळ म्हटले जाते. असा गूळ दिसायला चॉकलेटी, काळसर आणि मऊ असतो. केमिकल फ्री गुळात उसाची लागवड रसायनिक खते वापरून केली असली तरी चालते, पण गुळाची निर्मिती करताना मात्र त्यात कोणतेही केमिकल वापरले जात नाही. साहजिकच सेंद्रिय गुळाच्या तुलनेते केमिकल फ्री गुळाची गुणवत्ता कमी असते.

वाचा गुळाचे फायदे...

  • दररोज गुळाचा एक खडा खाऊन गरम पाणी पिण्याने शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत मिळते आणि अश्या आजारांपासून मुक्ती मिळते.
  • ज्यांना अन्न पचन सहज होत नाही त्यांच्या साठी गूळ आणि गरम पाणी हे रामबाण उपाय आहे.
  • ज्यांना गॅसचा त्रास होतो, त्यांनी दुपारच्या जेवणाच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर नक्कीच थोडासा गूळ खावा.
  • गूळ त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. गुळामुळे रक्तातील खराब पदार्थ बाहेर फेकले जातात, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि मुरुम होत नाही.
  • रिकाम्या पोटी त्याचे सेवन केल्याने त्वचा आणि स्नायू मजबूत बनतात. एवढेच नव्हे तर, रक्त रक्तसंचार सामान्य राहतो, ज्यामुळे हृदयरोग दूर होतात.
  • गूळ हा प्रथिनांचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. विशेषत: महिलांसाठी, त्याचे सेवन फार महत्वाचे आहे.
  • सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमियामध्ये याचा चांगला उपयोग होतो.
सेंद्रिय गुळात असलेल्या मॅग्नेशियमचा उपयोग स्नायुंच्या बळकटीसाठी होतो.
  • रोगप्रतिकार क्षमता वाढते तसेच रक्तदाबावर नियंत्रण राहते.
English Summary: most health benifit of jaggery Published on: 17 September 2021, 10:13 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters