1. आरोग्य सल्ला

सकाळच्या या वाईट सवयी देऊ शकतात अनेक रोगांना निमंत्रण, जाणून घ्या ते कसे?

सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपले शरीर आणि स्नायू खूप सक्रिय असतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
सकाळच्या या वाईट सवयी देऊ शकतात अनेक रोगांना निमंत्रण, जाणून घ्या ते कसे?

सकाळच्या या वाईट सवयी देऊ शकतात अनेक रोगांना निमंत्रण, जाणून घ्या ते कसे?

सकाळी जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपले शरीर आणि स्नायू खूप सक्रिय असतात. अशा परिस्थितीत आपण सकाळी शरीराबरोबर जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. कोणतीही चुकीची सवय बऱ्याच रोगांना कारणीभूत ठरू शकते. सकाळच्या नाष्ट्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. याशिवाय काही चुकीच्या सवयींमुळे साखरेच पातळीही अनियंत्रित होते. म्हणून उशीर न करता या चुका सवयींबद्दल माहिती जाणून घ्या.­

पाणी न पिणे:-

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे आणि नाष्टा झाल्यानंतर एका तासानंतर पाणी प्यावे. 

यामुळे केवळ वजन नियंत्रणामध्ये राहण्याचा फायदा होणार नाही तर आपण बऱ्याच प्राणघातक आजारांनाही टाळू शकता. पाणी पिण्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर जातात आणि चयापचय देखील चांगले होते.

व्यायाम न करणे:-

व्यायामामुळे तुमचे सर्व रोग कमी होऊ शकतात. जर आपले सतत वजन वाढत असेल किंवा काही मानसिक आजाराने ग्रस्त असाल तर सकाळच्या व्यायामाचा तुम्हाला चांगला फायदा होईल. आपण आपल्या दिनचर्येमध्ये व्यायामाचा समावेश न केल्यास आपण हळूहळू शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. आपण सकाळी धावणे, जॉगिंग किंवा सायकल चालविणे आवश्यक

सकाळी नाष्टा न करणे :-

असे बरेच लोक आहेत जे घाईघाईत नाष्टा करत नाही, हे लठ्ठपणा वाढवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. सकाळ नाष्टा केला नाही तर आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते कारण यामुळे आपली पचनक्रियेमध्ये बिघाड होत आणि मग तुम्हाला पोटाच्या समस्या सुरु होतात.

नाष्ट्यामध्ये या गोष्टींचा समावेश करू नका सकाळी घाईघाईत आपण हेल्दी खाण्याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फुडचा नाष्टा केल्यास आपले वजन अनियंत्रित होऊ शकते. प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सकाळी जंक फूड खाणे म्हणजे स्वतःच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.

रोज सकाळी उठल्यावर आपला दिनक्रम ठरलेला असतो, आधी काय करायचे, मग काय आणि नंतर काय. सवयींच्या रूपात आपण काही अशा गोष्टी देखील करतो ज्या मुळात चांगल्या नसतातच. तरीही ते आपल्या दिनक्रमाचा एक भाग बनतात. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या या सवयी विषासारख्या आहेत ज्या तुम्हाला आयुष्यात स्लो आणि नकारात्मक बनवतात. यामुळे अनेक वेळा आपल्याला शरीरात उर्जेची कमतरता देखील जाणवते. यामुळे सगळा राग घरात राहणाऱ्या लोकांवर किंवा कामावर निघतो. सर्व काही चुकीचे होऊ लागते. जर तुमच्यासोबत हे खरोखरच घडत असेल आणि तुम्हाला सर्व काही सुरळीत करायचे असेल तर आज येथे सांगितलेल्या या सकाळच्या तीन सवयी सोडा. 

English Summary: Morning time this habits is harmfull to our health know about in detail Published on: 25 March 2022, 01:58 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters