1. आरोग्य सल्ला

असे बनवा सितोपलादी चूर्ण आणि आरोग्याच्या सर्व तक्रारींपासुन व्हा मुक्त

आयुर्वेद औषधी भंडार अतिशय विशाल आहे. प्राचीन काळापासून ॠषिमुनींनी खुप मेहनत घेऊन

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
असे बनवा सितोपलादी चूर्ण आणि आरोग्याच्या सर्व तक्रारींपासुन व्हा मुक्त

असे बनवा सितोपलादी चूर्ण आणि आरोग्याच्या सर्व तक्रारींपासुन व्हा मुक्त

आयुर्वेद औषधी भंडार अतिशय विशाल आहे. प्राचीन काळापासून ॠषिमुनींनी खुप मेहनत घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आसव, अरिष्ट, चूर्णे, काढे, बनवून, सोबत याची कृती लिहून मानवजातीवर फार उपकार केले आहे.प्रत्येक घरात अगदी महत्वाचे आयुर्वेद औषध असायलाच हवे. आणि ते आहे 'सितोपलादी चूर्ण'.आज आपण बघणार आहोत याचे गुणधर्म व फायदे.सितोपला म्हणजे खडीसाखर, पिंपळी, वंशलोचन, दालचिनी, व विलायची अशी सर्व घटक द्रव्ये एकत्रीत करून तयार केलेलं चूर्ण

हे आहेत फायदे१) सितोपलादी चूर्णाच्या सेवनाने सर्व प्रकारचे श्वसनमार्गाचे विकार बरे होतात. दमा, छातीत कफ दाटणे, उबळ येणं, तीव्र खोकला येणे, उबळ येऊन सोबत रक्त येणे, या सर्व त्रासांवर एक छोटा चमचा भरून मध मिसळून घ्यावे रोज सकाळी संध्याकाळी सेवन करावे. याने आराम मिळतो.२) सितोपलादी चूर्ण हे पित्त नाशक आहे, जेव्हा शरिरात पित्त वाढते, त्यावेळी, हातापायांची आग होते, तोंडात कडु पाणी येते, छातीत जळजळ होते, उलट्या येतात, डोकं दुखणं, ज्वर येतो, अशा वेळी सितोपलादी चूर्ण एक कप दुधात मिसळून घ्यावे. सकाळी संध्याकाळी सेवन करावे, फार लवकर फरक पडतो आणि बरं वाटतं.

 

३) टाईफाईड, निमोनिया, अशा ज्वरानंतर येणारा थकवा, कमजोरी येते, भूक लागत नाही, चव जाते, अशा वेळी २ ग्राम चूर्ण मधात मिसळून द्यावे. काही दिवसांतच, भूक लागते, नवीन रक्त तयार होते.४) साइनोसायटिस- नाक चोक होणे, श्वास घेण्यास त्रास होणं, डोळ्यांच्या पोकळीत सर्दी साचते व डोळे व डोके दुखते, रुग्ण बेचैन होतो, अशा वेळी सितोपलादी चूर्ण एक छोटा चमचा भरून मधात मिसळून घ्यावे. हळूहळू त्रास दूर होईल.५) टाॅन्सिल्सची सूज व संक्रमण.. बरेच वेळा खाण्यात आंबट पदार्थ, तेलकट पदार्थ येतात, ज्यामुळे घश्याच्या टिश्युंना सूज येते, तिथे वेदना होतात, खाणे पिणे त्रासदायक होते, अशा वेळी, मधाने गुळण्या कराव्यात आणि. सितोपलादी चूर्ण २-३ ग्राम मधासोबत घेतल्यास आराम मिळतो.

६) लहान मुले अनेकदा किरकिर करतात, काहीच निट खात पित नाही, सर्दिमुळे नाक वाहत असतं. अशा वेळी सितोपलादी चूर्ण मधात मिसळून द्यावे, खुप लवकर फायदा होतो.ज्यांना अग्निमांद्य आहे, म्हणजे भूक लागत नाही,अशांनी सितोपलादी चूर्ण तुपासह घेतल्यास अग्निमांद्य दूर होते.सितोपलादि चूर्ण कृती :- १०० ग्राम वंशलोचन, २०० ग्राम खडिसाखर, ५० ग्राम पिंपळी, २५ ग्राम विलायची हिरवी, व १५ ग्राम दालचिनी.हे सर्व पदार्थ एकत्र कुटून याचे चूर्ण तयार करून हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि उपयोगात आणावे.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे 

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Make it Sitopaladi powder and be free from all health complaints Published on: 11 July 2022, 06:54 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters