1. आरोग्य सल्ला

मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कलिंगड

विषय आहे फळाच्या बाबतीतला आपल्या महाराष्ट्रामध्ये कलिंगड व खरबूज ही दोन पिके घेतली जातात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कलिंगड

मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे कलिंगड

उन्हाळ्याच्या दिवसांत तयार होणारे, कलिंगड हे फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे ६६० हेक्टर क्षेत्रावर तर खरबूजाची लागवड २३८ हेक्टर क्षेत्रावर केली जाते. मूळ आफ्रिकेतील असणारे हे फळ भारतात कर्नाटकमध्ये सर्वाधिक प्रमाणात तयार होते. त्याच्या अनेक जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. महाराष्ट्रात दोन्ही पिके उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. पूर्वी कोणत्याही पिकात आंतरपीक म्हणून किंवा नदीपात्रात, तलावात गाळपेर म्हणून कलिंगडाचे उत्पादन घेतले जात होते. मात्र, अलीकडे बाजारपेठेतील वाढती मागणी आणि मिळणारा भाव लक्षात घेऊन कलिंगडाचे मुख्य पीक म्हणून शेतकरी उत्पादन घेऊ लागले आहेत. या फळामध्ये चुना, फॉस्फरस ही खनिजे व अ, ब, क जीवनसत्वे असतात. उन्हाळ्यातील दाहकता कमी करणारे असे हे मधुर फळे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. मधुर, शीतल, तृष्णाशामक आणि उत्साहवर्धक अशा कलिंगडाला शास्त्रीय भाषेत 'स्त्रिटलस व्हल्गॅरिस' असे म्हणतात.

कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळ, याला वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाच्या फोडींचा हमखास उपयोग होताना दिसतो. कच्च्या कलिंगडाची भाजी तसेच लोणच्यासाठी उपयोग केला जातो. कलिंगडाच्या रसाचे सरबत उन्हाळ्यात फार चविष्ट व थंडगार असते. कलिंगडाचे फळ मधुर व स्वादिष्ट असते. त्याला एक प्रकारचा सुगंध असतो. कलिंगडापासून भरपूर मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती केली जाते. कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो. कलिंगड वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. कलिंगडाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागामध्ये अन्नघटकाचे प्रमाण पाहू 

पाणी- ९३% शर्करा पदार्थ- ३.३%

प्रथिने- २.०%

तंतुमय पदार्थ ०.२%

खनिजे - १.३%

चुना ०.१%साठी 

 स्फुरद ०.९%

लोह ०.८%

जीवनसत्त्व 'अ'- ११% - जीवनसत्त्व 'क'- १३%

जीवनसत्त्व 'ब'- १०% -जीवनसत्त्व 'ई- ७%

कलिंगडाचे आरोग्यादायी फायदे जाणून घेऊया कलिंगडामध्ये व्हिटामिन क आणि अ आढळते. या व्हिटामिन्समुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही चांगले रहाण्यास मदत होते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी कलिंगड जरूर खावे.कलिंगडामध्ये कमी प्रमाणात सोडियम असते तसेच हे थंड असते. किडनी स्टोनचा त्रास असेल अशा व्यक्तींनी जरूर कलिंगड खावे. कारण कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसेच किडनी साफ करण्यास कलिंगडाची मदत होते.कलिंगडामध्ये टोमॅटोप्रमाणे लायकोपिनचे प्रमाण भरपूर असते. लायकोपिन अॅण्टिऑक्सिटेंट असल्यामुळे कर्करोग दूर ठेवायला उपयुक्त ठरते. वजन कमी करण्यासाठी कलिंगडाचा डाएटमध्ये जरूर समावेश करावा. कलिंगडामध्ये कॅलरीज कमी असतात. मात्र अधिक काळापर्यंत पोट भरलेले ठेवण्यास मदत करतात.कलिंगड फळ खाण्याचे किंवा ताजा रस पिल्याने आरोग्यासाठी लक्षणीय फायदे होतात. या फळामध्ये सिटूलिन हे अमिनो आम्ल मोठ्या प्रमाणात असून, ते रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करते. अतिकष्टामुळे स्नायूंमध्ये आलेला ताण कमी करते.कलिंगड खाल्ल्याने त्यामध्ये असणारा चोथा व आद्रतेमुळे मलावरोधाची तक्रार कमी होऊन पोट साफ होते.व्यायामापूर्वी कलिंगडाच्या रसाचे सेवन केल्यास दाह कमी करते. त्यातील फ्लॅव्हेनॉइड, कॅरोटीनॉइड यासारखे घटक दाह निर्माण करणाऱ्या ट्रीटेरपेनॉइड घटकांशी लढतात.कलिंगडाचे बी टणक असल्यामुळे सोलायला कठीण असते. म्हणून थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करावे व त्याचा रस गाळणीतून गाळून घ्यावा व हे गाळलेले पांढरे दूध रश्श्याच्या भाजीत किंवा आमटीत घालावे. या बियांमध्येप्रथिने, क्षार व शरीरास उपयुक्त असा मेद भरपूर प्रमाणात असतात व त्याचा

आरोग्य चांगले राहण्यासाठी उपयोग होतो. सौंदर्यवर्धनासाठीही कलिंगड उपयुक्त ठरते. कलिंगडाची साल चेहऱ्यावर चोळल्याने चेहऱ्यावरचा तजेला वाढतो. उष्माघातामुळे शरीराची आग होत असेल तर तसेच उष्णतेमुळे डोळ्यांची, तळपायांची आग होत असेल तर कापलेल्या टरबुजाची साल त्या भागावर ठेवावी. थोड्याच वेळात शरीराची आग कमी होते.फळ खातांना घ्यावयाची काळजी कलिंगड हे फळ पिकल्यानंतर माठाखाली ठेवावे. पाण्याने ओले केलेले थंड कापड त्यावर टाकावे. त्यानंतर चार ते पाच तासांनी कलिंगड खावे. फ्रिजमध्ये ठेवून थंड केलेले कलिंगड खाऊ नये. तसेच एकदा कापलेले कलिंगड पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाऊ नये. कारण फळ कापल्यानंतर त्यातील पौष्टिक घटक कमी होतात. म्हणून ते लगेचच खावे. फ्रिजमध्ये कापून ठेवलेले ते शिळे कलिंगड खाल्ल्यास अनेक वेळा फूड पॉयझनिंग (अन्न विषबाधा होऊन जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला हे आजार होतात. अनेक जण कलिंगड खाताना त्यात मीठ टाकून खातात; परंतु कलिंगडामध्ये नसांगकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार असतात व मीठ टाकून या क्षारांचे प्रमाण अधिकच वाढते. म्हणून मीठ, साखर यांचा वापर न करता आहे त्या नसांगक स्थितीतील पिकलेले कलिंगड कापून लगेचच खावे विचार बदला जिवन बदलेल

 

डॉ. प्रणिता कडू

 गृहविद्यान विषय विशेषज्ञ

 कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती१

माहिती संकलन

मिलिंद जि गोदे

Save the soil all togethe

English Summary: Kalingad is important for human health Published on: 11 May 2022, 10:18 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters