1. आरोग्य सल्ला

औषधी गुणांनी युक्त आहे शेवगा शेवग्याचे आयुर्वेदिक लाभ.

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) शेवग्याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांपासुन आराम मिळतो. तसेच शेवगा त्याच्या औषधीगुनांमुळे, कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढण्याचे सामर्थ्य देखील देते. उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात. दुधाच्या 4पट -मटणाच्या 800पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
drumstick

drumstick

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;)

शेवग्याचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या शारीरिक आजारांपासुन आराम मिळतो. तसेच शेवगा त्याच्या औषधीगुनांमुळे, कोरोनासारख्या साथीच्या रोगाशी लढण्याचे सामर्थ्य देखील देते.

उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी. उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

दुधाच्या 4पट -मटणाच्या 800पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी

अशी शेवग्याची ख्याती आहे.

शेवगा वनस्पती औषध म्हणून देखील वापरले जाते.

 

भारतात अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे आढळतात. या भाज्यामध्ये शेवग्याचा देखील समाविष्ट आहे. शेवग्याला ड्रमस्टिक किंवा मोरिंगा असे संबोधले जाते. याचे पाने आणि फळांचा वापर करुन भाजी बनवतात.  आयुर्वेद मध्ये शेवग्याची चांगली महती आहे.  शेवग्याचा वापर औषध म्हणुन केला जातो. पोषक घटकांची मात्रा भरपूर आहे.  शेवग्यात पोटॅशिअम, आयरन, मॅग्नीशियम, कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, विटामिन-ए, सी आणि बी कांप्लेक्स सारख्या घटकांची मात्रा मोठ्या प्रमाणात आढळली आहे. चला जाणुन घेऊया शेवग्याचे औषधी गुणधर्म

 

 

सुज मध्ये फायदेशीर - शेवग्यामध्ये एंटी इंफलेमेटरी गुण आहेत.  होय संसर्ग किंवा दुखापत झाल्याने शरीरात सूज येऊ शकते.  अशा वेळेस शेवग्याचे सेवन करने फायद्याचे ठरते.

 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण करण्यास मदत करते - तुम्ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी शेवग्याचा वापर करू शकता. ते सेवन केल्याने मधुमेह आणि हृदयविकार इ. ची समस्या दूर होते. म्हणून, आपण रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील शेवग्याचा वापर करु शकता.

 

 

पोटाच्या विकारांवर फायदेशीर  - पोटाच्या विकारावर शेवग्याचा सेवन केल्यास लाभ मिळतो. गॅस, अपचन सारख्या पोटाच्या विकारांवर फायदेशीर ठरते.  हो शेवगा पोटाच्या विकार दूर करण्यासाठी मदत करते.

 

 

डोळ्याच्या तेजीसाठी - शेवग्याच्या शेंगा, पाने आणि  फुलांचा वापर डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. जर आपल्या डोळ्यांची दृष्टी कमी होत असेल तर आपण शेवग्याचे सेवन करू शकता.

 

 

केसांसाठी - शेवग्याच्या फुलांचा सेवन केल्यास केसगळती कमी होते.  नियमित सेवनाने केस गळती होण्यापासून बचाव होतो व केस वाढतात. आपण याच्या फुलांचा चहा  देखील करू शकता यामुळे केस चमकदार बनतात.

 

 

 

डोकेदुखी दूर करन्यासाठी - सहजनच्या पानांचे पेस्ट बनवून जखमेवर लावल्यास जखम भरते.  जखमेपासून आराम मिळतो.  त्याव्यतिरिक्त शेवग्याच्या पानांच्या भाजीच्या सेवनामुळे डोकेदुखीची समस्या दूर होते.

 

 

 

मुतखड्याची समस्या - बरेच लोक किडनी मधील मुतखड्याच्या समस्येमुळे परेशान असतात. या परिस्थितीत शेवग्याचे सुप किंवा भाजीचे सेवन करू शकतात, यामुळे मुतखडा मूत्रद्वारे पडू शकतो. ह्याच्या मुळीचा काढा बनवून देखील पिऊ शकतात यामुळे देखील मुतखडा बाहेर पडतो.

 

English Summary: health benifit of drumstick Published on: 27 August 2021, 09:15 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters